शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३३८ शाळांत महिला शिक्षिकाच नाहीत; कसे होणार समुपदेशन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 11:42 IST

ग्रामीण, शहरी भागात स्थिती सारखीच : यंत्रणेकडून अंमलबजावणीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असतात. १ लाख ९६ हजार ९८१ विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. यात विद्यार्थिनींची संख्याही मोठी आहे; मात्र शाळांची आणि विद्यार्थिनींची संख्या पाहता शाळांमध्ये शिक्षकांच्या तुलनेत महिला शिक्षक नसल्याने मुलींचे समुपदेशन कसे होणार, त्यांनी अडचण सांगायची तर कोणाला? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असते. जिल्ह्यातील जि. प. शाळेच्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक गुरुजी ज्ञानदानाचे काम करीत आहेत. जिल्ह्यात १२९७ शाळा आहेत. यात सुमारे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत दोन लाख विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

विद्यार्थिनींची संख्याही ९५ हजार ६९० आहे. दरम्यान, शाळांमध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी राज्यात खळबळ उडाली आहे. शाळेत शिकत असताना शिक्षणाबरोबरच मुलींना विविध अडचणींचा सामोरे जावे लागते. मुळातच मुली लाजाळू असल्याने आपल्या अडचणी स्पष्ट सांगू शकत नाहीत. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी महिला शिक्षक शाळेवर असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील ३३८ शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नसल्याने मुलींनी अडचण सांगायची तर कोणाला अन् मुलींचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

बहुतांश शाळांत महिला शिक्षकच नाहीत जिल्ह्यात १२९७ शाळा आहेत. मात्र, यात बहुतांश शाळांमध्ये महिला शिक्षक नसल्याने मुलींनी अडचण सांगायची तर कोणाला? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, बदलापूर येथील घटनेनंतर मुलींच्या संरक्षणासाठी शिक्षण विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

महिला शिक्षक केवळ ३३८ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची आणि विद्यार्थिनींची संख्या पाहता १२९७ शाळांमध्ये केवळ ३३८ महिला शिक्षक कार्यरत आहेत. यातच अनेक शाळांवर एकापेक्षा अधिक महिला शिक्षक कार्यरत असल्याने इतर शाळांमध्ये मात्र मुलींना महिला शिक्षकांची प्रतीक्षाच आहे.

शाळामध्ये दोन लाख विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळेच्या माध्यमातून १ ली ते १२ वी पर्यंत १ लाख १ हजार २९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९५ हजार ६९० विद्यार्थिनी शाळेतून धडे गिरवत आहेत.

कसे होणार मुलींचे समुपदेशन? 

  • ग्रामीण भागात जिपच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या सुमारे १२९७ शाळा आहेत. ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. 
  • मात्र, शाळांतील मुलींच्या अडचणी समजून घेण्यासाठीची जबाबदारी महिला शिक्षकांनी घेणे आता गरजेचे झाले आहे. मात्र, शिक्षकांची संख्या पाहता महिला शिक्षकांची संख्या अत्यंत कमी आहे.

उपाययोजना 

  • बदलापूर येथील घटनेनंतर सर्व शाळांत मुलीच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. 
  • तशा सूचनाही सर्व शाळांना दिल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकbhandara-acभंडारा