शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना झाली विषबाधा; तुमसर तालुक्यातील सुकळी येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:58 IST

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर : वैद्यकीय चमू गावात

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी विकणाऱ्याकडून पाणीपुरी खाल्ल्याने जवळपास ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार १० मार्च रोजी सकाळी समोर आला. यात २२ जणांना उपचारार्थ बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरित आठ जणांना आंधळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सुट्टी देण्यात आली.

सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी अन्न वितरण करण्यात आले. काहींनी कार्यक्रमाजवळ असलेल्या ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्यांकडील पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी व अन्नातून तब्बल तीस लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. परिणामी, येथील महिला, पुरुष व लहान बालकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. १० मार्च रोजी सकाळी हा प्रकार हळूहळू समोर आल्याने एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्या रुग्णांना प्रथम बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना आंधळगाव येथील डॉ. अनिकेत सपाटे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर योग्य औषधोपचार करून त्यांना मंगळवार, ११ मार्चला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. विषबाधा झालेल्या तीसही रुग्णांची प्रकृती बरी असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

११ मार्चला सुकळी येथे भरती असलेल्या २२ जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. तसेच रोहा, आंधळगाव, जांब व कांद्री येथील आठ रूग्णांनाही घरी सोडले.

यांना झाली विषबाधाविषबाधा झालेल्यांमध्ये हर्षदा नान्हे, तन्हू नान्हे, अश्विनी बुरडे, कविता डोळस, अक्षय डोळस, निहार बांडेबुचे, श्रेयश ठवकर, रियांश ठवकर, कौशिक जगनाडे, दिवेश शहारे, भावेश राऊत, सुप्रिया नेरकर, प्रियांशी राऊत, कांता राऊत, मनीषा राऊत, संकेत राऊत, रेखा राऊत, प्रज्वल भुरे, योगेश शहारे, प्रतीक शहारे, संजय शेंडे, मंगेश शेंडे, वर्षा डोळस, श्रेया डोळस, सतीश मुंडे (सर्व रा. सुकळी) व इतरांचा समावेश आहे.

वैद्यकीय चमू गावातसुकळी येथे बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय चमू गावात दाखल झाली. रुग्णांची तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. विषबाधीतांची भेट जि. प. सभापती नरेश ईश्वरकर, देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रहांगडाले, बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी शेख यांनी भेट दिली.

"अन्नातून व पाणीपुरीतून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी बेटाळा व देव्हाडी आरोग्य केंद्रात तर काहींना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे."- डॉ. व्ही. आर. रहांगडाले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हाडी

टॅग्स :bhandara-acभंडाराfood poisoningअन्नातून विषबाधा