शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात २८८२ लाभार्थी; ४९२८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:48 IST

४९२८ चा टार्गेट मंजूर : निधी खात्यात होणार जमा

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यात ४९२८ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून, पहिल्या टप्प्यात २८८२ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. थेट त्यांच्या खात्यात १५ हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी निवारा बांधण्याकरिता तळमळ सुरू केली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू अर्थात रेती मोफतचे धोरण मात्र वेटिंगवर आहे. लाखनी तालुक्याला ५०२८ च्या घरकुल टार्गेटपैकी ४९२८ मंजूर झाले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थी प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येतेयं.

खासगीत रेतीचा अवाच्या सव्वा दर!जिल्ह्यातील व लाखनी तालुक्यातील रेतीला मोठी किंमत मोजावी लागत आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर असलेला शासकीय रेती डेपो अजूनपर्यंत लाखनी तालुक्यात सुरू केलेला नाही. त्यामुळे ६०० रुपये ब्रासने मिळणारी रेती महाग झाली आहे. खासगीत चोरीच्या मार्गाने मिळणारी रेती घरकुल लाभार्थ्यांचे बजेट वाढवीत आहे.

"घरकुल लाभार्थ्यांना सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. वेळ व पैसा खर्च करण्याची आपदा लाभार्थ्यांना येऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी. मोफत रेती देण्याकरिता सुद्धा प्रशासनाने तत्परता दाखवावी."- शामराव बेंदवार, सरपंच, मन्हेगाव

"पंचायत समिती स्तरावरून घरकुल लाभार्थ्यांची यादी तहसीलला प्राप्त होते. त्यानंतर ती यादी रेती मंजुरीकरिता ऑनलाइन पाठविली जाते. ४८० लाभार्थ्यांची पाच ब्रास रेतीकरिता नोंदणी केलेली आहे. रेती डेपो सुरू होतील."- धनंजय देशमुख, तहसीलदार, लाखनी

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाbhandara-acभंडारा