शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

मुंबईच्या भरारी पथकाकडून २८ कामांची पाहणी

By admin | Updated: October 19, 2015 00:45 IST

मागील आठ ते दहा वर्षांपूर्वी झालेल्या २८ कामांची चौकशी करण्यासाठी मुंबई येथील अधीक्षक अभियंता स्तरावरील भरारी पथक ....

अहवालाची प्रतीक्षा : प्रकरण बनावट कामांचेभंडारा : मागील आठ ते दहा वर्षांपूर्वी झालेल्या २८ कामांची चौकशी करण्यासाठी मुंबई येथील अधीक्षक अभियंता स्तरावरील भरारी पथक भंडारा जिल्ह्यात दोन दिवस मुक्कामी होते. मंत्रालयातून पाठविण्यात आलेल्या या पथकाने कामांची चौकशी केली. या चौकशीत गंभीर प्रकार समोर आल्याचे सांगून महिनाभरात अहवाल देऊ, असे पथकाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शनिवारला एका माजी आमदाराने भंडारा विश्रामगृहात एका उपविभागीय अभियंत्याला शिवी व जीवे मारण्याची धमकी दिली, हे वृत्त चुकीचे असल्याचे माजी आमदाराने स्पष्ट केले. शनिवारला आपण विश्रामगृहात कार्यकर्त्यांसोबत असताना आपल्या स्वीय सहायकाला रागावत होतो. हे रागावणे तिथे उपस्थित अधिकारी स्वत:वर लावून घेत असतील तर ते चुकीचे आहे. याउलट आपण आमदार असताना या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी दोन वरिष्ठ अभियंते निलंबित झाले होते. या कामांची पाहणी करण्यासाठी आलेली ही चौथी चौकशी समिती आहे. या चौकशी समितीने निष्पक्ष चौकशी करावी, अशी आपली मागणी आहे. त्याकाळात जे लोक कंत्राटदार होते. ते आता पदावर आहेत. त्या काळात त्यांनी जी कामे न करता देयके उचलली आणि केलेली कामे निकृष्ट केली. त्या कामांचीही चौकशी निष्पक्ष व्हावी, अशी आपली मागणी आहे. याउलट मी किंवा माझ्या कुटुंबातील एकही सदस्य कंत्राटदार नाही. त्यामुळे या चौकशी समितीशी बोलण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचेही त्या माजी आमदाराने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)