शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

गौण खनिजाच्या कारवाईतून २.७८ कोटींची वसुली

By admin | Updated: February 5, 2017 00:16 IST

रेतीघाटातून रेतीसह गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे. अवैध उत्खनन करणाऱ्या वाहतुकदारांवर कारवाई केली जाते.

तरीही जिल्ह्यात रेती तस्करी सुरूच : सर्वाधिक गुन्ह्याची नोंद मोहाडीतराजू बांते मोहाडीरेतीघाटातून रेतीसह गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे. अवैध उत्खनन करणाऱ्या वाहतुकदारांवर कारवाई केली जाते. या कारवाईतून एप्रिल २०१६ ते १ फेब्रुवारी २०१७ पर्यंत दोन कोटी ७८ लाख ७३,९२६ रूपये वसूल करण्यात आले. आजपर्यंत अवैध गौण खनीज वाहतुकदारांवर ९७ गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात मोहाडी तालुका अव्वल ठरला आहे.भंडारा जिल्ह्यात विविध घाटावरून चोरीने रेती काढली जाते. इतर गौण खनिजाची अवैधपणे वाहतुक केली जाते. रेती व गौण खनिजातून शासनाचा महसूल बुडत आहे. रेती व गौण खनिजांच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यासाठी चौक्या लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा चालक महसूल विभाग व पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात. या पसार होण्यात महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांचे संगनमत असते. तरीही महसूल विभागाच्या लक्षांकपूर्तीसाठी अवैध रेती व गौण खनिज संपत्ती वाहतूक करणाऱ्यांना पकडून वसूली केली जाते. अशा या अवैध रेती व इतर गौण खनिज नेणऱ्या वाहतुकदारांकडून एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत २ कोटी ७८ लक्ष ७३ हजार ९२६ रूपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहे. ३ फेब्रुवारी अखेरपर्यंत सात तालुके व जिल्हा खनिज शाखा यांनी रेती व इतर गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर केलेल्या कारवाईचे १०९९ प्रकरणे आहेत. सर्वाधिक प्रकरणे मोहाडी तहसिलचे आहेत. यात भंडारा १६८, पवनी १४२, मोहाडी २०९, तुमसर १५९, लाखनी ७८, लाखांदूर १७५, साकोली १५० व जिल्हा खनीज शाखा १८ अशी नोंद आहे. २ फेब्रुवारीपर्यंत ९७ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ४२ गुन्हा नोंद प्रकरणाची नोंद एकट्या मोहाडीत करण्यात आली आहे. भंडारा येथे ८, पवनी ३९, तुमसर ५, लाखांदूर २ व प्रत्येकी एक लाखनी व साकोली येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. जिल्हा खनिज शाखेने एकही गुन्ह्याची नोंद केली नाही. चेक पोस्टवर पवनी येथे ११९, भंडारा ६६, मोहाडी २३ व तुमसर येथे ३७ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात एकही वाहनांची तपासणी करण्यात आली नाही. आजपर्यंत रेती व इतर गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर केलेल्या कारवाईबाबत तालुकानिहाय विवरणानुसार झालेल्या वसुलीबाबत क्रमांक एकवर जिल्हा खनिज शाखा अव्वल आहे. जिल्हा खनीज शाखेने ८७ लाख ९९,५५० रूपये वसूल केले आहे. भंडारा तालुका ४४ लाख ४७,८०० रूपये, पवनी ४६ लाख ७९,०५३, मोहाडी ३९ लाख ३९,८५१, तुमसर २८ लाख ९३,८१२, लाखनी ६६ लाख ५,५६०, लाखांदूर १२ लाख १३,४००, साकोली १२ लाख ३४ हजार ९०० रूपये असे दोन कोटी ७८ लाख ७३ हजार ९२६ रूपये अवैध रेती व गौण खनिज वाहतुकदारांकडून वसूल करण्यात आले.मोहाडीत ४१,६०० वसुलीअवैध वाहतूक करणारे रेतीचे नेरी येथे सकाळी तीन ट्रॅक्टर तहसिलदार धनंजय देशमुख यांनी पकडले. यातून ४१ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला.