शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

रेतीचे २७ ट्रक पकडले

By admin | Updated: December 13, 2015 00:29 IST

लिलावात खरेदी केलेल्या रेती साठा ऐवजी लिलावधारकाकडून राजरोसपणे नदीतून रेतीचा उपसा केला जात असल्याची ...

आष्टीवासीयांचा पुढाकार : रेती साठा उचलण्याऐवजी नदीतून करीत होते उपसातुमसर : लिलावात खरेदी केलेल्या रेती साठा ऐवजी लिलावधारकाकडून राजरोसपणे नदीतून रेतीचा उपसा केला जात असल्याची तक्रार अनेकदा करुनही महसूल विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज, शनिवारी सकाळी १.३० वाजताच्या सुमारास आष्टी येथील जवळपास ४५० गावकऱ्यांनी रेती घाटावर जावून अवैध रेतीचे तब्बल २७ ट्रक पकडले. या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली.नदीघाटातून रेतीचे उत्खनन करुन जेसीबीद्वारे ट्रकमध्ये रेतीची वाहतूक करीत असताना ही कारवाई करण्यात आली. मागील महिन्यात आष्टी रेतीघाटाजवळ साठा असलेल्या ७०० ब्रास रेतीचा लिलाव करण्यात आला. १,५०० रुपये ब्रासप्रमाणे १० लाख ५० हजार रुपयांची रेती केवळ १४ रुपये अधिक बोली लावून लिलावधारकाने अधिकाऱ्यांच्या संगणमताने खरेदी केली. त्यानुसार लिलावधारकाला ७०० ब्रासच्या टीपी महसूल विभागाला मिळताच लिलावधारकाने मिळत्याजुळत्या नंबरचे ट्रक घाटावर बोलावून साठा केलेल्या रेतीचा उपसा न करता थेट बावनथडी नदीपात्रातून उपसा करीत होते. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या शेतीला धोका निर्माण झाला. पाण्याची पातळी खालावली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी लिलाव धारकाला घाटावर जावून समज देण्यात आली. केवळ साठा केलेल्या रेतीचा उपसा करावा, असे बजावण्यात आले होते. मात्र लिलावधारकाने याकडे दुर्लक्ष केले. त्याने राजरोसपणे नदीघाटातून उत्खनन सुरुच ठेवले होते. यासंबंधी महसूल विभागाला तक्रार देण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर आज, शनिवारी आष्टी वासीयांनी रेतीघाट गाठले. २१ ट्रक पकडण्यात आले. यानंतर याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदारांना देण्यात आली. अधिकारी घटनास्थळी दाखल होताच ट्रक पालिसांच्या स्वाधीन करण्यात आले. लिलावधारकाने लिलावात घेतलेली रेती दोन दिवसात उचल करुन साठा असलेली रेती संपल्याचे पत्र तहसिलदारांनी ग्रामस्थांना लिहून द्यावे, ही मागणी रेटून धरली. रेतीघाटावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. नायब तहसीलदार हरिश्ंचद्र मडावी यांनी मध्यस्थी करुन तोडगा काढला. कारवाईचे नेतृत्व पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले, बालचंद्र नागपूरे, मारोती नागपूरे, चेतन गौपाले, अनिल गौपाले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)