शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

वीज कोसळल्याने ४ वर्षात २६ जणांचा मृत्यू; १६ प्रस्तावांना मंजूरी केव्हा?

By युवराज गोमास | Updated: May 14, 2024 18:52 IST

जिल्ह्यात कोसळणारी वीज थांबणार कधी? : यंदा ११ जनावरांचा मृत्यू

भंडारा : जिल्ह्यात सन २०२२ ते २०२३ या कालावधीत वीज कोसळून २६ जणांचा जीव गेला. यंदा अवकाळीत जीवहानी झाली नसली तरी ११ जनावरांचा मृत्यू झाला. परंतु, जिल्ह्यात एकही ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने यंदा सुधारीत १६ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. परंतु, अद्यापही मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोसळणारी थांबणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू शेतशिवारात, मोकळ्या जागेत झाले आहेत. सध्या जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटाने थैमान घातले आहे. यामुळे उन्हाळी धान पीक व भाजीपाला पीक संकटात सापडले आहेत. कुठे ना कुठे वीज कोसळण्याची चिन्हे दिसून येतात. घराबाहेर पडायची भीती नागरिकांत असते.

जिल्ह्यात २०२० मध्ये वीज कोसळून चार जणांचा बळी गेला. यात भंडारा, पवनी व तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. २०२१ मध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. यात भंडारा, तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर मोहाडी तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. २०२२ मध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. यात भंडारा एक, पवनी तीन, तर तुमसर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

काय आहे वीज अटकाव यंत्रणा?

शहरातील सर्वाधिक उंच इमारतीवर वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित केली जाते. ही यंत्रणा १०० मीटर परिसरात वीज कोसळण्यास अटकाव करते; परंतु यासाठी लाखोंचा खर्च येतो. जिल्ह्यात अशी यंत्रणा कुठेही नाही.

सुधारीत प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित करण्यासंबंधीचे सुधारीत १६ प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापच्यावतीने शासनाकडे पाठविले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये यासंबंधीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते; परंतु कुठेही प्रश्न निकाली निघाला नाही.

जिल्ह्यात एकही यंत्रणा कार्यान्वित नाही

जिल्ह्यात १३३० मिलिमीटर पाऊस होतो. सध्या विजेच्या कडकडाटासह अवकाळी मुसळधार पाऊस कोसळत आहे. विजेच्या धक्क्याने चार वर्षांत २६ जणांचा बळी गेला. परंतु, अद्यापही वीज अटकाव यंत्रणा एकाही ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांत सातत्याने भीतीचे वातावरण पाहावयास मिळते.

मृताच्या कुटुंबियांना मिळणारी मदतशासनाच्यावतीने मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत दिली जाते. ४० ते ६० टक्के अपंगत्वासाठी यापूर्वी ५९,१०० तर आता ७४ हजार, ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्वासाठी पूर्वी दोन लाख तर आता २.५० लाख, एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास पूर्वी १२,७०० तर आता १६ हजार व त्यापेक्षा कमी काळ उपचारासाठी पूर्वी ४,३०० तर आता ५४०० रुपयांची मदत दिली जाते.

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यासंबंधीचे १६ सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. सध्या विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होत आहे. नागरिकांनी मोकळ्या मैदानात व पावसात थांबू नये. दामिनी ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन माहिती घ्यावी.- अभिषेक नामदास, प्रमुख आपत्ती व्यवस्थापन, भंडारा. वीज पडून झालेले मृत्यू

वर्ष                मृत्यू संख्या

२०२४                ००२०२३                ०२

२०२२                १४२०२१                ०६

२०२०                ०४

टॅग्स :bhandara-acभंडाराDeathमृत्यू