शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

२३,७४२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हयातील

आजपासून परीक्षा- कॉपीमुक्त अभियानासाठी ४० भरारी पथकाची नियुक्तीभंडारा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हयातील ३०३ शाळांमधील विद्यार्थी ८८ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा देत आहे. परिक्षेसाठी २० हजार ५५६ नियमित विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बैठे पथकांसह ४० भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक परीक्षेदरम्यान केंद्रांवर होणारी कॉपी व अनुचित कार्यावर करडी नजर ठेवणार आहेत. विभागिय शिक्षण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभाग दहावीच्या परिक्षेसाठी सज्ज झाला आहे. भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षाधिकारी किसन शेंडे म्हणाले, मागील वर्षीप्रमाणे दहावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तथा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहील. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रात संचालित झेराक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर कॉपीमुक्त अभियान यशस्वीतेसाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांसाठी २७ भरारी पथकाची आवश्यकता आहे. मात्र, शिक्षण विभाग व दक्षता समितीने ४० भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. पथकात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, राजस्व प्रमुख, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, नगरपरिषदचे मुख्याधिकारी व अन्य ३ सदस्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर बैठे पथकाची चमू स्थापित करण्यात आली आहे. यात तीन जणांची नियुक्ती केली आहे. (शहर प्रतिनिधी)२३,७४२ विद्यार्थी देणार परीक्षा जिल्ह्यात दहावीच्या परिक्षेसासाठी ८८ परीक्षा केंद्र आहेत. यावर्षी २३,७४२ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. यात २०,५५७ विद्यार्थी नियमित आणि ३,१८५ पूर्नरपरीक्षार्थीचा समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परिक्षेची तयारी पुर्ण करण्यात आली आहे.दक्षता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशया संदर्भात दक्षता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत ८८ परीक्षा केंद्रावरील परिसर स्वच्छ ठेवावा. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थीनींची तपासणी महिला शिक्षकांमार्फत करावी. परीक्षेचे कामकाज करण्याकरिता नियुक्त केलेल्या व्यक्तीशिवाय परीक्षा केंद्रावर इतर व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, यांची काळजी घ्यावी. बैठे पथकांनी परीक्षा कालावधी दरम्यान बसून न राहता परिक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधी दरम्यान बंद ठेवण्यात यावे. पाणी वाटपासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी. परिक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा गैरप्रकार होऊ नयेत, परीक्षा शांततामय वातावरण व परीक्षार्थ्यांना भयमुक्त व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता आली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.