शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोहरणा येथे २३ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:17 IST

शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना सांगितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना सांगितली आहे. त्यामुळे गत दहा वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे ओबीसी छावा संग्राम परिषदेच्या वतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार सेवक वाघाये, जेसा मोटवानी, अ‍ॅड. संजय गुरू, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, प्रमिला कुटे, सभापती मंगला बगमारे, भरत खंडाईत, रामचंद्र राऊत, चंद्रशेखर ठवरे, रमेश भैय्या, योगेश कुटे, गोपीचंद राऊत, वासुदेव तोंडरे, सरपंच प्रभाकर मेंढे, उपसरपंच बबन नागोसे, भुमेश्वर महावाडे, नरेश दिवटे, ताराचंद मातेरे, गजानन नाकतोडे, सुभाष आजबले, राजु पालीवाल, अशोक चांडक आदी उपस्थित होते.या विवाह सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यात ८ जोडपी बौद्ध धर्माची होती. आठ जोडप्यांचा विवाह बौध्द पद्धतीने तर १५ जोडप्यांचा विवाह हिंदू पद्धतीने पार पाडण्यात आला. विवाहबद्ध झालेल्या २३ जोडप्यांना नाना पटोले यांनी कपडे व एलईडी भेट स्वरूपात देऊन स्वत: पालकत्व स्विकारून कन्यादान देखील केले.विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक नाना पिलारे यांनी केल. संचालन यशवंत नखाते यांनी, तर आभार प्रदर्शन मंगेश राऊत यांनी केले. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी छावा संग्राम परिषद व मोहरणा ग्रामवासीयांनी सहकार्य केल.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले