शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

शिष्यवृत्तीमुळे १७० विद्यार्थी लाभान्वित

By admin | Updated: February 16, 2017 00:26 IST

२०१६-१७ या शैक्षणिक सत्राकरिता ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या दिल्या गेलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा येथील १७० विद्यार्थ्यांना मिळाला.

भंडारा : २०१६-१७ या शैक्षणिक सत्राकरिता ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या दिल्या गेलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा येथील १७० विद्यार्थ्यांना मिळाला. एका आयोजित कार्यक्रमात निवडक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ज.मु. पटेल महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना दरवर्षी या उपक्रमा अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लावण्यासाठी पुस्तके, बस पास, शिकवणी वर्गाची फिस, परीक्षा शुल्क आदीच्या स्वरूपात मदत करते. या स्तुत्य उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. संघटनद्वारे दिल्या जाणाऱ्या या मदतीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फार मोलाची मदत झाली आहे. सदर शिष्यवृत्ती करिता संघटनेच्या व्यवस्थापन समितीद्वारे गरजू विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक मुलाखती घेतल्या जातात व त्यांच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या या स्तुत्य आणि सातत्यपुर्ण उपक्रमाची व त्यांच्या सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेची प्रशंशा केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. डी.आय. शहारे यांनी संघटनेच्या वैशिष्टपुर्ण कार्याची प्रशंशा केली. संघटनेचे संयोजक रामविलास सारडा यांनी मिळलेल्या मदतीचे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त बीज करावे असे आवाहन केले. अशा उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्या कडून मिळत असलेल्या सहकार्याचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांना महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यास हातभार लावताना धन्यता वाटते, असेही ते म्हणाले. याप्रसंगी महेंद्र निंबार्ते, कुमार नशिने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संघटनेचे सदस्य राधाकिसन झंवर, इंद्रजीत आनंद, मोहन नायर, उद्धव डोरले, दिपक सारडा, नदीम खान आदींचे सहकार्य लाभले. ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्नीकर यांनी संचालन केले. डॉ. प्रशांत धनवलकर, डॉ. उमेश बन्सोड, डॉ. आनंद मुळे व डॉ. विणा महाजन यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)