नेरी येथे १६ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:34 IST2020-12-29T04:34:06+5:302020-12-29T04:34:06+5:30

भंडारा : अत्यंत निर्दयपणे वाहनात कोंबून वाहतूक करणाऱ्या १६ जनावरांची सुटका वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी येथे करण्यात आली. ...

16 animals rescued at Neri | नेरी येथे १६ जनावरांची सुटका

नेरी येथे १६ जनावरांची सुटका

भंडारा : अत्यंत निर्दयपणे वाहनात कोंबून वाहतूक करणाऱ्या १६ जनावरांची सुटका वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी येथे करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरशाद खान निशार खान ३१, अजहर कलाम बेग रा. चंगेरा जि. गोंदिया, दिनेश सुखदेव बाबुलकर, हिवराज मंगरू तांडेकर आणि श्रावण ग्यानीराम शहारे तिघे रा. खमारी ता. मोहाडी अशी आरोपींची नावे आहेत. वरठी पोलिसांची गस्त सुरू असताना नेरी शिवारात वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी एका ट्रकमध्ये जनावरे आढळून आले. अत्यंत निर्दयपद्धतीने या जनावरांना वाहनात कोंबण्यात आले हाेते. यावेळी नऊ हेले, एक म्हैस, दोन बैल आणि चार गोऱ्यांची सुटका करण्यात आली. या जनावरांची किंमत सहा लाख १० हजार रुपये आहे. याप्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वंजारी करीत आहे.

Web Title: 16 animals rescued at Neri