शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१,५७१ कृषिपंपांना हवाय ‘करंट’

By admin | Updated: May 18, 2015 00:32 IST

केंद्रासह राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवीत असले तरी भंडारा जिल्ह्यातील मागील वर्षीचे १,५७१ कृषिपंप ..

हंगामाची चिंता : पैसे भरूनही जोडणीसाठी होतोय विलंब, सर्वाधिक प्रकरणे लाखनी तालुक्यातीलदेवानंद नंदेश्वर भंडाराकेंद्रासह राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवीत असले तरी भंडारा जिल्ह्यातील मागील वर्षीचे १,५७१ कृषिपंप वीजजोडणीपासून प्रलंबित आहेत़ याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून ते संकटात सापडलेले आहेत़ प्रलंबित असलेली वीजजोडणी यावर्षीच्या सत्रात पूर्ण करण्याचा लक्षांक वीज वितरण कंपनीला दिला असला तरी वीज पंपांना अजुनही ‘करंट’ मिळालेला नाही. जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे़ कधी ओला तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी पूर्णत: खचलेला आहे़ शेतकऱ्यांचे जीवनमान उचवावे, यासाठी शासनाने शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या सहायाने शेती करण्यासाठी विशेष योजना आखली़ कृषिपंपाच्या साहाय्याने खरिपासह रबी पिकांची लागवड करावी, कृषिपंपामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, अशी अपेक्षा शासनाची आहे़ परंतु भंडारा जिल्ह्यात ३१ मार्च अखेरपर्यंत १,५७१ कृषिपंपाचची वीजजोडणी प्रलंबित आहे़ यामध्ये भंडारा तालुक्यातील २३८, मोहाडी तालुक्यातील २१०, तुमसर - ९३, पवनी - २०८, साकोली - २६९, लाखनी - ४३४, तर लाखांदूर तालुक्यात ११९ वीज जोडणी प्रलंबित आहे़ प्रलंबित वीजजोडणी २०१५-१६ मध्ये पूर्ण करण्याचा लक्षांक जिल्हा प्रशासनाचा आहे़ सदर जोडणी दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे़ यात पहिल्या टप्प्यांमध्ये ६२९ वीजजोडणी सहा महिन्यांमध्ये तर एक वर्षामध्ये ९४२ वीजजोडणी करण्यात येईल़ वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणारी कृषिपंप वीजजोडणी दि़३१ मार्च २०१४ अखेर १,५३२ इतकी प्रलंबित होती़ २०१४-१५ या वर्षात २,७९८ कृषिपंप वीज जोडणीचे अर्ज प्राप्त झाले़ त्यामुळे ३१ मार्च २०१५ पर्यत एकुण ४,३३० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्यात २,७५९ वीजजोडणी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात १९२, मोहाडी तालुक्यात १८६, तुमसर तालुक्यात १६२, पवनी तालुक्यात ६७६, साकोली तालुक्यात ५११, लाखनी तालुक्यात ५२६ तर लाखांदूर तालुक्यात ५०६ वीज जोडणीचा समावेश आहे़ ३१ मार्च २०१४ अखेर १,५३२ कृषिपंपाची वीज जोडणी प्रलंबित होती़ यामध्ये भंडारा तालुक्यात २०५, मोहाडी तालुक्यात ३३६, तुमसर तालुक्यात ९८, पवनी तालुक्यात ३३९, साकोली तालुक्यात २११, लाखनी तालुक्यात २८२ तर लाखांदूर तालुक्यात ६१ वीज जोडणींचा समावेश होता़ सन २०१४-१५ यावर्षात २,७९८ अर्ज वीज वितरण कंपनीकडे प्राप्त झाले़ यामध्ये भंडारा तालुक्यात २२५, मोहाडी तालुक्यात ६०, तुमसर तालुक्यात १५७, पवनी तालुक्यात ५४५, साकोली तालुक्यात ५६९, लाखनी तालुक्यात ६७८ तर लाखांदूर तालुक्यात ५६४ अर्ज वीजजोडणीसाठी प्राप्त झाले होते़ मागील वर्षीचे प्रलंबित १,५७१ वीज जोडणी सन २०१५-१६ वर्षात पूर्ण करण्याचा उदिष्ट आहे़ खरीप आणि रबी, अशा दोन्ही हंगामात उत्पादन घेता यावे म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनांतर्गत शेतात विहिरी व बोअर केल्या आहेत. यानंतर वीज पुरवठ्यासाठी वीज वितरणकडे रितसर अर्ज केले. त्यासाठी आवश्यक त्या रकमेचा भरणाही केला; पण २०१५ अखेरपर्यत जिल्ह्यातील तब्बल एक हजार ५७१ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे विहीर आणि पाणी असताना सिंचन करणे अशक्य आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरी खोदून देण्याच्या योजना आखल्या. योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीसाठी अर्ज केले. त्यानुसार विहिरी मंजूर झाल्या. खोदकाम, बांधकामही पार पडले. याला एक ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला; पण त्या विहिरी शेतकऱ्यांच्या उपयोगी पडल्या नाहीत. विहिरी पूर्ण झाल्यानंतर वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीकडे रितसर अर्ज केले. यासाठी लागणारी अनामत रक्कमही शेतकऱ्यांनी अदा केली. आता वीज पुरवठा होईल, अशी अपेक्षा असताना गत अडीच वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज जोडणीच मिळाली नाही, हे वास्तव आहे.सध्या कडक उन्हाळाही सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनचे आगमन झाल्यास शेतकरी पेरते व्हा चा नारा देतात; पण गत काही वर्षांत पावसाची अनियमितता मोठे संकट निर्माण करते. अनेकदा पाऊस लांबतो. यामुळे पेरण्या खोळंबतात. परिणामी, उत्पन्नावर विपरित परिणाम होतो. मागीलवर्षी १,५३२ कृषिपंप वीजजोडणीचे लक्ष्य देण्यात आले होते. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यात आली. २०१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्यात २,७५९ वीजजोडणी करण्यात आली़ प्रलंबित १,५७९ कृषिपंपाची जोडणी यावर्षीचे उद्दिष्ट आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांना कृषिपंपाचा लाभ घेता येईल, यासाठी वीज वितरण कंपनी कामाला लागली आहे. - सतीशकुमार मेश्राम,अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, भंडारा,