शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंह मंदिरात अडकलेल्या 15 भाविकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

बुधवारी सकाळी मुंढरीचे सात, हिवराचे दोन, आंधळगाव येथील दोन, तुमसर व तामसवाडी येथील प्रत्येकी एक असे भाविक दर्शनासाठी गेले होते. मात्र, संततधार पावसाने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पुजारी मनोहर निंबार्ते यांच्यासह १५ भाविक मंदिरात अडकले. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण संचारले हाेते. अखेर करडी पोलिसांना माहिती कळताच त्यांनी तहसीलदार व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. मंदिरात सात स्त्रिया व आठ पुरूष अडकल्याचे पुढे आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दर्शनासाठी गेल्यानंतर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मोहाडी तालुक्यातील माडगी येथील मंदिरात अडकलेल्या १५ ही भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि करडी पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी नावेच्या मदतीने भाविकांना बाहेर काढण्यात आले. यामुळे प्रशासनासह भाविकांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.वैनगंगा नदीच्या पात्रात मोहाडी व तुमसर तालुक्यांच्या सीमेवर नृसिंह मंदिर आहे. बुधवारी सकाळी मुंढरीचे सात, हिवराचे दोन, आंधळगाव येथील दोन, तुमसर व तामसवाडी येथील प्रत्येकी एक असे भाविक दर्शनासाठी गेले होते. मात्र, संततधार पावसाने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पुजारी मनोहर निंबार्ते यांच्यासह १५ भाविक मंदिरात अडकले. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण संचारले हाेते. अखेर करडी पोलिसांना माहिती कळताच त्यांनी तहसीलदार व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. मंदिरात सात स्त्रिया व आठ पुरूष अडकल्याचे पुढे आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तुमसर उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी, मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे, तुमसरचे तहसीलदार बाळासाहेब टेळे, करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलास पाचारण करण्यात आले. मात्र, बुधवारी रात्र झाल्याने बचाव कार्यास पहाटेच्या सुमारास प्रारंभ करण्यात आले. सर्व भाविकांना दोन नावांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी, मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे, तुमसर तहसीलदार बाळासाहेब टेळे, करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड, तुमसर ठाणेदार सुरेंद्र चिंचोळकर, बचाव पथकाचे दोन अधिकारी व २३ कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी वैभव काळे, रोहित नंदेश्वर उपस्थित होते. 

करडी पोलिसांनी नदी तीरावर रात्र काढली जागून- माडगी येथे सायंकाळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल दाखल झाले. मात्र, रात्र झाल्याने भाविकांनी सकाळी बचाव कार्य करण्याची विनंती केली. त्यामुळे करडी पोलिसांनी नदी तीरावर अख्खी रात्र जागून काढली. पाण्याची पातळी वाढत असल्याचे दिसून येताच भाविकांना उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री दरम्यान भाविकांची अनेकदा आस्थेने विचारपूस करण्यात आली. घाबरू नका, आम्ही सुखरूप बाहेर काढू, असा धीर देण्यात आला.

 

टॅग्स :floodपूरRainपाऊस