शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

महिनाभरात एसटीचे १५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

३१ ऑक्टोबर रोजी तिरोडा आणि गोंदिया तर २ नोव्हेंबरपासून भंडारा,  साकोली आणि पवनी आगाराचे कर्मचारी संपावर गेले. तेव्हापासून एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. दररोज साधारणत: ४५ लाख रुपयांचे नुकसान होत असून महिनाभरापासून सुरू असलेल्या या संपाने १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून गत महिनाभरापासून सुरू असलेल्या संपानेएसटी महामंडळाच्या भंडारा विभागाचे तब्बल १५ कोटींचे नुकसान झाले आहे. दीड हजारावर कर्मचारी संपावर ठाम असून ३६७ बसेस आगारात एकाच जागेवर उभ्या आहेत. दुसरीकडे प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उचलले. भंडारा विभागात ३० ऑक्टोबरपासून संपाला सुरुवात झाली. सुरुवातीला तुमसर आगारातील कर्मचारी संपावर गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी तिरोडा आणि गोंदिया तर २ नोव्हेंबरपासून भंडारा,  साकोली आणि पवनी आगाराचे कर्मचारी संपावर गेले. तेव्हापासून एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. दररोज साधारणत: ४५ लाख रुपयांचे नुकसान होत असून महिनाभरापासून सुरू असलेल्या या संपाने १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भंडारा विभागातील सहा आगारांत १८३५ कर्मचारी असून त्यापैकी दीड हजारावर कर्मचारी संपावर आहेत. एसटीच्या दररोज २६५२ फेऱ्या निघत होत्या. मात्र आता एकही फेरी निघत नाही. महामंडळाने कारवाईचा बडगा उभारला आहे.

साकोलीतून धावली लालपरी, डीएमने फाडली तिकिटे- साकोली : एसटी महामंडळाचा संप असला तरी गत दोन दिवसांपासून साकोली आगारातून तुरळक बसफेऱ्या सुरू आहेत. मंगळवारी व बुधवारी साकोली आगाराच्या दोन बसेस भंडारापर्यंत गेल्या. यावेळी आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी स्वत: प्रवाशांना तिकिटे दिली. साकोली ते भंडारा बससेवा सुरू करताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात ही बस निघाली. बस क्रमांक एमएच ४० एल ८९८५ ही मंगळवारी ११.५० वाजता २७ प्रवासी घेऊन भंडाऱ्याकडे रवाना झाली. चालक लुंगाराम शिवणकर होते. प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसाला दोन-तीन फेऱ्या सुरू राहतील, असे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले. 

एसटीचे इंजीन लाॅक होण्याची भीती- गत महिनाभरापासून एसटी बसेस एकाच ठिकाणी उभ्या आहेत. देखभाल दुरुस्तीही ठप्प आहे. त्यामुळे दीर्घकाळ बंद असलेल्या या बसेसचे इंजीन लाॅक होण्याची भीती आहे. तसेच ऑईलही गोठण्याची शक्यता आहे. यामुळे संप मिटला तरी एसटी सुरू करण्यासाठी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर कामावर येण्यास कुणी तयार नाही. लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. -डाॅ. चंद्रकांत वडस्कर,  विभागीय वाहतूक निरीक्षक

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप