शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती आणि दोन ट्रकसह १.२० कोटींचा माल जप्त; मोहाडीतील महसूल अधिकाऱ्यांनी रात्री घातली धाड 

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 17, 2024 18:40 IST

वाहन चालकाने आपल्या लेखी बयाणात, दोन्ही ट्रक बपेरा (तहसील तुमसर) येथून विना रॉयल्टी रेती भरण्यात आल्याची कबुली दिली.

भंडारा: तुमसर तालुक्यातील बपेरा घाटावरून विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर परिविक्षाधिन उपविभागीय अधिकारी अनय नावंदर यांच्या पथकाने जप्तीची कारवाई केली. या कारवाईत रेतीसह दोन ट्रक मिळून १ कोटी २० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आता हे दोन्ही ट्रक मोहाडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

१६ फेब्रुवारीच्या रात्री मोहाडीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या महसूल पथकातील नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार, तलाठी संकेत बिरानवार, कोतवाल चंद्रकुमार नंदनवार, सुनील गायधने, दिनेश खंगार यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दहेगाव येथील राज्य मार्गांवरील माया राईस मिलच्या समोर क्रमांक एम.एच.२७/बी.एक्स. ३८२३ आणि एम.एच. २७/बी.एक्स. ८३५६ या क्रमांकाचे दोन ट्रक थांबवून तपासणी केली. दरम्यान, वाहन चालकाकडे रेती वाहतूक परवाना नसल्याचे लक्षात आले. यामुळे दोन्ही ट्रकचा जप्तीनामा व पंचनामा करून रेती भरलेले ट्रक पोलिस स्टेशन मोहाडी येथे जमा करण्यात आले.  चालकाने दिली कबुलीवाहन चालकाने आपल्या लेखी बयाणात, दोन्ही ट्रक बपेरा (तहसील तुमसर) येथून विना रॉयल्टी रेती भरण्यात आल्याची कबुली दिली. या दोन्ही वाहनांवर प्रत्येकी ६ लाख १८ हजार रुपयांच्या महसुली दंडाची रक्कम आकारण्यात येणार असून, जवळपास १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तुमसरचे महसूल अधिकारी करतात काय ?तुमसर तालुक्यातील बपेरा येथून रेतीची अवैध वाहतूक होत असताना मोहाडी तालुक्यातील महसूल पथकाद्वारे अनेक वेळा कारवाई केली. येथे कारवाई होत असताना तुमसरमधील महसूल व पोलिस पथक करतात तरी काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. तुमसरमधून अवैध वाहतूक होत असताना आतापर्यंत एकही कारवाई झाली नसल्यामुळे महसूल व पोलिस पथकाच्या कर्तव्यावर हे प्रश्नचिन्हच आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराCrime Newsगुन्हेगारी