शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची ११९ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:18 IST

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा पोलीस दलात सध्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. मंजुर पदांपैकी अधिकारी व कर्मचारी यांची एकूण ११९ पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. यावर अजुनपर्यंत तोडगा न निघाल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

ठळक मुद्देकामाचा वाढतोय ताण : पोलीस उपनिरीक्षकांची जिल्ह्यात हवी ३० पदे

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा पोलीस दलात सध्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. मंजुर पदांपैकी अधिकारी व कर्मचारी यांची एकूण ११९ पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. यावर अजुनपर्यंत तोडगा न निघाल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.जिल्हा पोलीस दलात आस्थापनावरील पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या पदाअंतर्गत जवळपास ६० पदे रिक्त आहेत. पोलीस उपअधीक्षकांची मंजुर पदे सहा असून त्यापैकी तीन पदे रिक्त आहेत. यापैकी बदली अंतर्गत एक पद रिक्त असल्याने याची संख्या चार एवढी झाली आहे. जिल्ह्यातील १७ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस निरीक्षकांची दोन पदे रिक्त आहेत. सहायक पोलीस निरीक्षकांची ३५ पदे मंजुर असून त्यापैकी १४ पदे रिक्त आहेत. सर्वात जास्त रिक्त पदे पोलीस उपनिरीक्षकांच्या आहेत. यात ६९ पदे मंजुर असताना प्रत्येक्षात मात्र ३७ पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावर आहेत. प्रत्यक्षरित्या ३२ पदे रिक्त असून संभाव्यस्थितीत ३० पदांवर अधिकार नेमणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बिनतारी संदेश वहन अंतर्गत पोलीस निरीक्षकाचे एक पद, पोलीस निरीक्षकाचे एक पद, नागरी हक्क सुरक्षा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षकाचे एक पद, महामार्ग सुरक्षा पोलीस उपनिरीक्षकांचीतीन पदे तर मोटर परिवहन विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षकाचे एक पद रिक्त आहे.बॉम्ब शोधक पथकातील अधिकारी नाहीपोलीस दलात बॉम्ब शोधक नाशक पथक कार्यरत आहे. याअंतर्गत जिल्हा पातळीवर पोलीस उपनिरीक्षक पदा अंतर्गत दोन अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परंतु ही दोन्ही पदे रिक्त असल्याने आपातकालीन स्थितीत परजिल्ह्यातून बॉम्ब शोधक नाशक पथकातील अधिकारी व कर्मचाºयांना बोलाविण्याची नामुष्की जिल्हा पोलीस प्रशासनावर येवू शकते. परिणामी सदर दोन्ही पदे भरणे आवश्यक आहे.कर्मचाºयांची ५९ पदे रिक्तजिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाईपर्यंतची एकूण ५९ पदे रिक्त आहेत. यात सहायक पोलीस उपनिरीक्षकांची ११६ पदे मंजुर असून चार पद रिक्त आहेत. पोलीस हवालदारांची सहा तर पोलीस नाईक पदाची सात पदे रिक्त आहेत. पोलीस शिपाईची ४२ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण १५६४ पोलीस कर्मचारी असून त्यापैकी १५०५ कर्मचारी कर्तव्यावर आहेत.सद्यस्थितीत कामाचा ताण वाढला आहे. अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत मोठी कसरत करावी लागते. शासनस्तरावर रिक्त पदे भरण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.-विनिता साहू,जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा