शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

प्रशासनाने हटविले जिल्हाभरातील २२५२ फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहेत. नागरिकांनी संदेश काळजीपूर्वक वाचूनच फॉरवर्ड करावेत.

ठळक मुद्देचौकांनी घेतला मोकळा श्वास : आदर्श आचार संहितेअंतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्ह्यातील चौकाचौकात लावलेले २२५२ फलक हटविले आहेत. यात होर्डींग, बॅनर, पोस्टर आणि पॉम्प्लेटचा समावेश आहे. यामुळे गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.विधानसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा होताच आदर्श आचारसंहिता सुरु झाली. आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिले.या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद, नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खासगी व शासकीय कार्यालय परिसरात असलेले होर्डींग, बॅनर, पोस्टर्स ४८ तासाच्या आत हटविण्याची कारवाई निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. साकोली, तुमसर आणि भंडारा विधानसभा क्षेत्रातील तब्बल २२५२ फलक हटविण्यात आले आहेत.तुमसर क्षेत्रात सर्वाधिक १५४९, साकोली ५२४ आणि भंडारा क्षेत्रात १७९ फलकांचा समावेश आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशा स्वरुपाचे बॅनर, पोस्टर्स, फलक लावण्यावर मनाई करण्यात आली आहे.शासकीय परिसरात लावण्यात आलेले २४ तास, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले ४८ तास आणि खासगी ठिकाणी लावण्यात आलेले फलक ७२ तासात हटविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. या आदेशान्वये जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. हटविण्यात आलेल्या जागेवरील फलक पुन्हा लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.शहरी भागासह ग्रामीण भागात नेत्यांच्या वाढदिवसापासून ते विविध कार्यक्रमांचे फलक लावण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतरही महिनोंमहिने फलक दिसून येत होते. आता आदर्श आचारसंहितेने सर्व फलक काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.सोशल मीडियावर सायबर सेलची नजरविधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहेत. नागरिकांनी संदेश काळजीपूर्वक वाचूनच फॉरवर्ड करावेत. कुठल्याही व्यक्तीची, समाजाची, धर्माची, महिलांची, राजकीय व्यक्तींची प्रतिमा मलीन होईल असे मॅसेज फॉरवर्ड करू नये. विशेष म्हणजे सोशल मिडीयावरील मॅसेजला सायबर सेल मॉनीटरींग करणार आहे. अनावधानाने सुद्धा पोस्ट लाईक किंवा शेअर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019