शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पोळ्याच्या बाजारात करदोड्याचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:18 IST

बाजारात लहान-मोठ्या २५ हून अधिक दुकानांमध्ये बैलाचा साज विक्रीस उपलब्ध होता. यात दोर, वेसण, म्होरके, गोंडे, केसई, कांस्य, पितळ आणि तांब्याच्या धातूतील अलंकार विकले गेलेत. अलंकारामध्ये बैलाचे चार पायात घालायचे चार पैंजण ३५० रुपयांना विकले गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गुरुवारी पोळ्याचा आदल्या दिवसाचा परतवाड्यातील बाजार रंगला. एरवी कंबरेला बांधायचा, नारळाला गुंडाळायचा नामशेष झालेल्या करदोड्याचीही बाजारात बऱ्यापैकी विक्री झाली.बाजारात लहान-मोठ्या २५ हून अधिक दुकानांमध्ये बैलाचा साज विक्रीस उपलब्ध होता. यात दोर, वेसण, म्होरके, गोंडे, केसई, कांस्य, पितळ आणि तांब्याच्या धातूतील अलंकार विकले गेलेत. अलंकारामध्ये बैलाचे चार पायात घालायचे चार पैंजण ३५० रुपयांना विकले गेले. गळ्यातील घंटी, घोगवर, चाळजोड, घुंगरू, गळ्यातील गोफरूपी तोडा, वेगवेगळ्या आकारातील घुंगराचे साज, डोक्यावरील मंठाळी, कवड्यांची माळ, अंगावरील झुल यांसह सर्वच बाजारात उपलब्ध होते.चामड्याच्या साहित्यात बेलडी, घुंगरपट्टा, वाढी, वादीची वीण, तर लोखंडामध्ये जुवाडीची शिव यांसह बैलजोडी व शेतीच्या अनुषंगाने वेगवेगळे साहित्य विकत घेण्यात आले. मेळघाटातील आदिवासी बांधवांचीही या बाजाराला गर्दी होती. वेगवेगळ्या रंगातील सुताचे दोर आणि दोरापासून बनविलेल्या साहित्याने बाजार उठून दिसत होता.

टॅग्स :Farmerशेतकरी