शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
3
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
4
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
5
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
6
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
7
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
8
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
9
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
10
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
11
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
13
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
14
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
15
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
16
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
17
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
18
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
19
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
20
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?

झेन कथा - चालेल, चालेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 03:22 IST

Zen story : झेनसाधनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत साधना होऊ शकते.  सान सा निम जगभर झेनसाधनेचे शिबिरं भरवण्यासाठी फिरत असत.  बरेच वेळा ते पोलंडमध्ये जायचे.  पोलंडमध्ये जागा मिळणे कठीण असायचे.  एकच खोली मिळायची.

- धनंजय जोशी

झेनसाधनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत साधना होऊ शकते.  सान सा निम जगभर झेनसाधनेचे शिबिरं भरवण्यासाठी फिरत असत.  बरेच वेळा ते पोलंडमध्ये जायचे.  पोलंडमध्ये जागा मिळणे कठीण असायचे.  एकच खोली मिळायची.  एकदा आमच्या शिबिराला एकच खोली मिळाली  आणि साठ साधकांनी रजिस्ट्रेशन केलं.  करणार काय?  ध्यानासाठी बसायला जागा कुठे?  तीन दिवसांचे शिबिर!  मग सान सा निम म्हणाले, ‘काही हरकत नाही.  आपण स्टँडिंग मेडिटेशन करूया!’ तीन दिवस सगळे साधक उभे राहून ध्यान करत राहिले. आणखी एकदा नव्वद दिवसांचे शिबिर होते.  तेव्हा आमच्याकडे एक साधक होता; पण त्याला पाठीचा खूप त्रास होता.  त्याला सरळ बसता होत नसे.  सान सा निम त्याला म्हणाले, तू झोपून साधना कर.  तो फक्त जेवण्यासाठी उठून बसायचा आणि नंतर इतर सर्व वेळी झोपलेल्या (म्हणजे खरे झोपलेल्या वेळी) किंवा आडवा पडून साधना करायचा. माझ्या घरी मेडिटेशन सेंटर असताना शिबिरं व्हायची. तेव्हा आमच्याकडे एक ८६ वर्षांची साधक यायची.  अर्थात, तिला ते अशक्य होते; पण ती उभे राहून अर्धे वाकून झेन नमस्कार घालायची. नंतर काही वर्षांनंतर ती हे जग सोडून गेल्यानंतर तिच्या अंतिम संस्कारासाठी तिच्या मुलीने मला बोलावले होते. तिच्या सांगण्यावरून.  हे साधनेचे सामर्थ्य नाहीतर दुसरे काय?ध्यान करायला नुसते आसनावरती बसायला हवे असे नाही.  उभे राहताना, चालताना, झोपलेले असताना, केव्हाही आपल्या मनाशी हा ध्यान संवाद विलक्षण  लक्ष देऊन करू शकतो.  आपल्याला अगदी साधी जागा, शांत जागा मिळालीच पाहिजे, असे कुणी सांगितले? आणि एकदा हे समजले की भाजीत जरा मीठ कमी पडले, पोळी जरा कडक झाली, पुरी जरा जास्त तळली गेली, भात  जरा खूप मऊ शिजला, तरी त्याच्याशी आपण म्हणू शकू, ‘चालेल, चालेल’.  ती जे काही समोर येईल त्याला हो म्हणायची साधना!  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक