शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वास्तूदोष दूर ठेवण्यासाठी घरात आवराआवर करताना स्वच्छतेचे 'हे' नियम अवश्य पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 17:25 IST

वास्तूमध्ये मंगल लहरी निर्माण होण्यासाठी प्रसन्न संगीत, सुगंध, फुलझाडं यांचा वापर करा. मंद स्वरात देवाचा नामजप सुरु ठेवा. त्यामुळे वातावरणात सहजता राहते. 

आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सगळेच जण रोज प्रयत्न करतो. स्वच्छ घरात वातावरण प्रसन्न राहते आणि प्रसन्न वातावरणामुळे मनही प्रसन्न राहते. म्हणजेच स्वच्छतेचा परिणाम थेट आपल्या तना-मनावर होत असतो. यासाठी वास्तू शास्त्रात दिलेले पुढील नियम अवश्य पाळा. त्याचा लाभ होऊन वास्तू दोष निर्माण होणार नाहीत आणि असल्यास दूर होतील. 

ब्रह्म मुहूर्तावर आणि तिन्ही सांजेला घरात केर काढू नये. हे दोन्ही मुहूर्त लक्ष्मीच्या आगमनाचे मुहूर्त मानले जातात. त्यामुळे स्वच्छता करायची असल्यास या मुहूर्ताच्या आधी किंवा नंतर केर काढावा. 

घरातील कोपरे स्वच्छ ठेवावेत. विशेषतः ईशान्य, उत्तर, वायव्य या दिशांचे कोपरे स्वच्छ असावेत. 

घरात कचरा टाकू नका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच केराचा डबा वेळच्या वेळी धुवून स्वच्छ ठेवा. 

गुरुवार सोडून आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून घराची जागा पुसा. त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. वादविवाद संपतील. तसेच लक्ष्मी घरात स्थिर राहील. 

घराच्या स्वच्छतेइतकेच घरातल्या प्रसाधन गृहालाही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जाळे, जळमट लागू देऊ नका. तसेच तिथली फरशी स्वच्छ ठेवा. वास्तू मध्ये नकारात्मकता तिथून प्रवेश करते. म्हणून तेथील स्वच्छतेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. 

घरात फार काळ अडगड साचू देऊ नका. अडगळ साचल्यामुळे घरात वाद विवाद होतात. घरातल्या लक्ष्मीचा क्षय होतो. घरात अडगळ असणे, हे वास्तूच्या दृष्टीने घातक मानले जाते. म्हणून पेपरची रद्दी असो नाहीतर जुन्या आणि वापरात नसलेल्या तुटक्या वस्तू असोत. त्यांची वेळोवेळी विल्हेवाट लावायला शिका. 

वास्तूमध्ये मंगल लहरी निर्माण होण्यासाठी प्रसन्न संगीत, सुगंध, फुलझाडं यांचा वापर करा. मंद स्वरात देवाचा नामजप सुरु ठेवा. त्यामुळे वातावरणात सहजता राहते. 

घराइतकाच महत्त्वाचा आहे घराचा उंबरठा. तो रोजच्या रोज स्वच्छ करून, शक्य असल्यास सायंकाळी उंबरठ्याजवळ दिवा लावून त्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. तसेच रोज सकाळी दोन बोटं रांगोळी काढा. तो लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असल्याने तेथील स्वच्छताही महत्त्वाची आहे. 

नीटनेटके आवरलेले घर जसे आपल्याला आवडते, तसे देवालाही आवडते. अशा घरात सुख, शांती, समृद्धी सदैव नांदते.