मासिक पाळीच्या काळात पतीने आपल्या पत्नीला बघूही नये, असा नियम पूर्वी का पाळला जात होता? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:51 PM2023-08-09T16:51:28+5:302023-08-09T16:52:34+5:30

लैंगिक संबंध आणि त्यासंदर्भातील धर्मशास्त्रीय नियम यामागे सखोल अभ्यास आणि दूरदृष्टीने विचार होता, कसा ते जाणून घ्या. 

Why was the rule followed earlier that a husband should not even look at his wife during menstruation? Read on! | मासिक पाळीच्या काळात पतीने आपल्या पत्नीला बघूही नये, असा नियम पूर्वी का पाळला जात होता? वाचा!

मासिक पाळीच्या काळात पतीने आपल्या पत्नीला बघूही नये, असा नियम पूर्वी का पाळला जात होता? वाचा!

googlenewsNext

>> सागर सुहास दाबके

कुठेही स्त्री पुरुष लैंगिक संबंधांचा विषय निघाला की त्याबद्दल खरंतर गांभिर्याने बोलायला हवं, नीट अभ्यास असायला हवा, पण नेहमी असे दिसते, की हा विषय निघाला कि थट्टा करायची अतोनात हुक्की येते लोकांना।

एका ठिकाणी गर्भाधान संस्कार होता. सकाळी संस्कार झाला आणि संध्याकाळी त्या यजमानाचेच मित्र गप्पा मारताना म्हणाले, ''आज सकाळीच गर्भाधान झालंय, आज रात्री बेत लावेल गडी, आज काय तो गप्पा मारायला येत नाही'', असे म्हणून हसले आणि एकमेकांना टाळ्या दिल्या. हे सगळं त्यातील एकाची पत्नी ऐकत होती, त्यांचं नुकतंच लग्न झालेलं, ती नंतर म्हणाली, ''ही अशी आपल्या वैयक्तिक गोष्टींची थट्टा होणार असेल तर मला नाही करायचे कुठले संस्कार!"

अशाप्रकारच्या शेरेबाजीमुळे चांगल्या गोष्टी बाजूला राहतात आणि नको त्या गोष्टींबद्दल मनात अढी निर्माण होते. त्याला जबाबदार आपण ठरतो. म्हणून अशा गोष्टींची थट्टा टाळावी, एवढेच नाही तर या संदर्भात कोणाला माहिती हवी असल्यास योग्य तोच सल्ला द्यावा अन्यथा एखाद्याचे सांसारिक जीवन उध्वस्त होऊ शकते. असेच आणखी एक उदाहरण बघा. 

सगळे म्हणतात कि, "संबंध कसे ठेवायचे हे कोणाला शिकवायला लागत नाही, लग्न झालं की ते आपोआप येतं! प्राण्यांना कोण शिकवतं?" 
हा समज मोडून काढायला हवा, नीट मार्गदर्शन घेतल्याशिवाय प्रजोत्पादनाचा उद्योग करू नये. आणि पतिपत्नी दोघांना सुखप्राप्ती होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहेच. 

एकदा एकजण हनिमूनला गेलेला, तिथे गेल्यावर नेमकी त्याची पत्नी बाजूला झाली, म्हणजे तिला पाळी आली. उत्कंठा वाढल्यामुळे संप्रेरकांचे संतुलन बिघडून असे होऊ शकते. दोघेही नवखे असल्याने तो गोंधळून गेला,  त्याने मोठ्या विश्वासाने त्याच्या ओळखीच्या एका जुन्या जाणत्या व्यक्तीला फोन केला, की असं असं झालंय, तर आता काय करू?

त्यावर तो जुना जाणता माणूस हसला आणि म्हणाला, "अरे वा, आता तर अजून मजा येईल, पाळीत स्त्री पण तापलेली असते आणि लुब्रिकंट पण मिळतं " असे एकदम हिणकस आणि खालच्या पातळीचे उद्गार ऐकून तो खिन्न झाला!

ही गोष्ट खरी, की पाळी चालू असताना स्त्रीमध्ये कामभावना वाढलेली असते कारण शरीरसंबंध हा बऱ्याचदा 'पेन किलर' चे काम करतो आणि स्त्री शरीर अत्यंत पीडेत असल्याने त्यातून सुटका होण्यासाठी शरीरसंबंधांची सहज भावना उत्पन्न होते. पण यात मोठी हानी अशी आहे की या काळात संबंध आले तर बऱ्याचदा पाळी थांबते किंवा स्राव होण्याचे प्रमाण कमी होते, अथवा पाळी यायची वेळ जवळ आल्ये आणि त्यात संबंध आले तर पाळी लांबते सुद्धा!

म्हणून आपल्या धर्मशास्त्रात पतीने आपल्या रजस्वला स्त्रीचे मुखदर्शन सुद्धा घेऊ नये असे सांगितले आहे. कारण निर्धारापेक्षा इंद्रिये बलवान असतात हे पूर्वसुरींना माहीत होते. त्यामुळे, 'हे काय नेहमीचंच आहे, यात काय शिकवायचं? इतकी युगानुयुगे प्रजा वाढली ती काय लैंगिक शिक्षण घेऊन?' या भूमिकेचा त्याग करायला हवा! स्त्रीपुरुष संबंधांना थट्टा मस्करी म्हणून न बघता खेळीमेळीने आणि त्याच वेळेस गांभीर्याने हाताळले पाहिजे. 

Web Title: Why was the rule followed earlier that a husband should not even look at his wife during menstruation? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.