शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण! पितामह भिष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 22:50 IST

कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. पण असं अन्न चुकूनही खाऊ नेय...

बहुतेक घरांमध्ये पती-पत्नी एकाच ताटात जेवण करतात. एका ताटात जेवण केल्याने परस्पर प्रेम वाढते, असे त्यांना वाटते. तथापि, वडीलधारी मंडळी आणि धर्मशासत्राचे जाणकारही सांगतात, की पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. पण असे का म्हटले जाते? या संदर्भात लोकांना अनेकदा माहिती नसते. खरे तर, महाभारतातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर जाणून घेऊया पती-पत्नीने एका ताटात का जेवू नये.

पती-पत्नीने एकाताटात जेवण करू नये... -एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते, हे मुळीच नाकारता येणार नाही. पितामह भीष्म यांनाही हे माहीत होते. पण त्यांचे म्हणणे होते, की प्रत्येक व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती अनेक कर्तव्ये असतात. यामुळे, जर ही कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायची असतील आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे असतील, तर पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. खरे तर, पत्नीसोबत एका ताटात जेवण केल्याने पतीसाठी, कुटुंबातील इतर नातेसंबंधांच्या तुलनेत तिच्याबद्दलचे प्रेम सर्वोपरि होते. यामुळे व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो योग्य आणि अयोग्य यात फरक करू शकत नाही. जर पतीचे पत्नीवरील प्रेम सर्वोपरि झाले तर कुटुंबात विसंवादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पत्नीसोबत ताटात जेवण करू नये.

कुटुंबाने सोबत बसून जेवण करायला हवे - कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. सोबतच एकमेकांप्रती त्याग आणि समर्पण भावनाही प्रबळ असते. यामुळे कुटुंबाची प्रगतीही होते, असे भीष्म पितामह यांचे मत होते. असं अन्न चुकूनही खाऊ नेय - भीष्म पितामह यांच्या मते, जर कुणी जेवणाचे ताट ओलांडले तर ते चिखलाप्रमाणे दूषित होते. ते जनावरांना द्यायला हवे. याशिवाय, जर कुणी जेवणाच्या ताटाला पाय मारून गेले, तर अशा अन्नाला हात जोडून नमस्कार करावा व ते टाकून द्यावे. असे अन्न दारिद्र आणते.

 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारfoodअन्नFamilyपरिवार