शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

साष्टांग नमस्काराला अष्टांग नमस्कार असे का म्हणतात? नमस्काराच्या प्रकारांमध्ये तो श्रेष्ठ का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 8:34 AM

पूजेत जे षोडशोपचार आहेत, त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे. दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार. देव देवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते.

नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात, असे म्हणतात. नमस्कार करण्यात नम्र भाव असतो. जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठायी अहंकार असतो, ती ताठ राहते. परंतु, ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकांपुढे, माता-पित्यांपुढे, वडिलधाऱ्या मंडळींपुढे, अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते. परंतु आजच्या काळात नमस्कार करणे, हे कमीपणाचे वाटते. नमस्कार कर, असे मुलांना सांगावे लागते. कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाहीत. मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार, गुडघ्यावर बसून डोके टेवकवून नमस्कार किंवा येता जाता राम राम म्हणत अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडली होती. 

पूजेत जे षोडशोपचार आहेत, त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे. दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार. देव देवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते. नमन, प्रणाम, प्रणती, नती, दंडवत असेही शब्द नमस्काराला आहेत. 

या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत. कायिक, वाचिक आणि मानसकि हे ते तीन प्रकार आहेत. कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय. तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण, हा नमस्कार करते वेळी हृदय, माथा, पाय, गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात, म्हणून याला अष्टांग प्रणाम असेही म्हणतात. या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामबरोबरच मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रेत असतो. सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो. हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे.

हरि ऊँ, रामराम, हरहर महादेव, जयजय रघुवीर समर्थ असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर म्हणतो, हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे.विशेषत: आंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी `हरगंगे भागीरथी' असे म्हणतात. गंगेला तर हिंदुमात्रांच्या जीवनात अनन्यसाधारण भक्तिभावनेचे स्थान आहे. जीवनात एकदा कधी तरी काशीला हरद्वारला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे वा अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणणे, हा झाला मानसिक नमस्कार. तेथे जाणे शक्य झाले नसेल, तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो. 

म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक, वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार घाला.