शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
2
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
3
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
4
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
5
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
6
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
7
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
8
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
10
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
11
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
12
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
13
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
14
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
15
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
16
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
17
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
18
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
19
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
20
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."

नदी किंवा संगमाला नमस्कार का करावा? केवळ प्रथा म्हणून नाही, जाणून घ्या त्यामागचा अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 17:36 IST

लहानात लहान कृतीमागे पूर्वजांचा दूरदृष्टीने केलेला विचार जाणून घ्यायचा असेल, तर केवळ कृती न करता त्याचा भावार्थ जाणून घेण्याची जिज्ञासा कायम ठेवा!

>> हृषीकेश श्रीकांत वैद्य 

आपण पूर्वी बघितले असेल की ट्रेन ने जाताना नदी किंवा खाडी (नदी - समुद्र संगम) लागला की बहुतांश लोकांचे हात आस्थेने जोडले जायचे. काही जण लहान मुलांना त्यात अर्पण करण्यासाठी नाणी द्यायचे. तर, आपले पूर्वज नक्की का करायचे असं? तर, संगम किंवा नदी हे जीव आणि शिवाच्या एकरूप होण्याचे प्रतीक आहे. जसा सागरापासून बाष्पीभवनामुळे तयार झालेला ढग दूर गिरी पर्वतांवर जाऊन बरसतो, त्या प्रत्येक थेंबाला आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच सगरात एकरूप होण्याची ओढ लागलेली असते. अनेक पर्वतरांगा, दऱ्या, अरण्य, इ पार करत करत तो थेंब सागराच्या दिशेने धाव घेत असतो व अंततोगत्वा शेवटी तो सागराला जाऊन मिळतो त्यात एकरूप होतो. 

जसा एक छोटा थेंब जिद्दीने सागरात जाऊन एकरूप होतो  त्याचप्रमाणे आपला आत्मा हा त्याच्या मूळ तत्वात म्हणजेच परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होवो ही नमस्कार करण्यामागची  भावना. आपल्या जीवनाचा नेमका उद्देश्य काय आहे? आपण जन्माला का आलो? आपण नक्की काय करत आहोत ? का करत आहोत ? नक्की काय करायला हवं ? काय साध्य करायला हवं ? हे प्रश्न जो पर्यंत आपल्याला पडत नाहीत व योग्य गुरूंकडून त्याची उत्तरे मिळत नाहीत तो पर्यंत आपला जन्म घेणेच व्यर्थ आहे ! 

गंगेपुढे मन शांत होते. गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे. गंगास्नानाने पापक्षालन होते. परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो. या गंगास्नानाचे दुसरे महत्त्व असे की, आपल्या पाठीमागे कायम ग्रहपीडा असते. कोणाला शनीपीडा, कोणाला मंगळ पीडा असते, या सर्व पीडा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात. 

हिमालयात गंगेचा उगम होतो, त्या ठिकाणाला गंगोत्री म्हणतात. तेथूनच ती ऋषिकेश व हरिद्वारला येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे अवश्य जाऊन या. तोवर आपल्या हाती असलेले पाणी गंगेचे पुण्य स्मरण करून तीर्थ समजून प्या व पाण्याची नासाडी न होता ते जपून वापरा. आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन नदी, संगम किंवा कोणताही जलस्त्रोत्र दिसल्यावर नतमस्तक जरूर व्हा!