शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वास्तूच्या प्रवेश दारावर घोड्याची नाल का लावतात? त्यामुळे खरोखरच आर्थिक लाभ होतात का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:58 IST

लोखंड हा शनीचा प्रिय धातू असल्याने घोड्याची नाल वापरण्यासाठी वास्तुशास्त्राने दुजोरा दिला आहे. सविस्तर जाणून घ्या!

ज्योतिषशास्त्रात सोने, चांदी, लोखंड आणि इतर धातूंचे विशेष महत्त्व आहे. तसेच या धातूंना धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र तसेच वास्तू शास्त्रानेही धातूंच्या वापराला प्राधान्य दिले आहे. असे मानले जाते की प्रत्येक धातू कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी आणि देवतेशी संबंधित आहे. यापैकी एक धातू म्हणजे लोखंड. लोखंड शनिदेवाला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की शनिवारी लोखंडापासून बनलेली कोणतीही दान करावी पण विकत घरी आणू नये, अन्यथा शनिदोष होऊ शकतो. मात्र अपवाद आहे, घोड्याची! 

शनिवारी घोड्याची नाल दाराला लावल्याने अनेक लाभ होतात. घराची आर्थिक स्थिती सुधारते. तसेच नकारात्मक लहरींपासून घराचे संरक्षण होते. वास्तू दोष दूर होतात आणि घरात सकारात्मकता वाढीस लागते. 

वास्तू दोषांसाठी प्रभावी उपाय : 

घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास, वास्तुदोषामुळे तुम्ही सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत अडकत असाल तर कार्यालय, व्यवसाय किंवा घराच्या मुख्य दाराला घोड्याची नाल लटकवू शकता. यामुळे तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल आणि तुमच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. 

शनि दोष दूर करण्यासाठी

जर व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर त्या व्यक्तीने झोपताना आपल्या अंथरुणाजवळ डोक्याशी घोड्याची नाल ठेवावी. याशिवाय मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी. त्याचा फायदा होईल आणि शनिदोषापासून मुक्तीही मिळेल.

करिअरच्या यशासाठी : जर विद्यार्थ्याला अभ्यासात रस नसेल आणि करिअरमध्ये पुढे जाण्यात काही अडचण येत असेल तर शनिवारी घोड्याच्या नालीपासून बनवलेली किंवा लोखंडी  अंगठी मधल्या बोटात घालण्यास द्यावी. त्यामुळे मनावर संयम राहून अभ्यासात मन एकाग्र होण्यास मदत मिळेल. 

आजारपणासाठी : घरातील कोणताही सदस्य आजारी पडला असेल तर घोड्याची नाल विकत आणून वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. त्यामुळे घरातील आजारपण दूर होते. 

वैयक्तिक लाभासाठी  : ज्योतिष शास्त्रानुसार घोड्याची नाल धारण केल्याने सुख-समृद्धी मिळते असे मानले जाते. म्हणून, जर तुम्हाला पैसा वाढवायचा असेल तर तुमच्या कष्टाला जोड देण्यासाठी तिजोरीत घोड्याची नाल ठेवा. नक्कीच फायदा होईल. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र