शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

हनुमंताला देवत्त्व प्राप्त का झाले, याचे किष्किंधाकांडात केले आहे वर्णन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 09:30 IST

श्रीरामाच्या परिवारात लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, जांबुवान, सुग्रीव, बिभीषण यासारखी कितीतरी पराक्रमी आणि गुणी मंडळी आहेत, परंतु श्रीरामाप्रमाणे देवत्त्व प्राप्त झाले, ते हनुमंताला!

महर्षी वाल्मिकींच्य रामायणात श्रीरामाच्या नंतर हनुमंताचेच व्यक्तिमत्त्व आपले चित्त वेधून घेते. जन्मत: सूर्यबिंबाकडे गरुडझेप घेणारा बाल हनुमान हा एक `न भूतो न भविष्यति' असा चमत्कार आहे. असा आगळा पराक्रम केवळ महाकपि हनुमंतच करू जाणे.

हनुमंत हा अंजनी नामक वानरीचा पुत्र, परंतु तो वायूच्या कृपा प्रसादाने झालेला असल्याने त्याच्या अंगी असा जगावेगळा पराक्रम करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले. या हनुमंताला त्याच्या बालपणी अनेक देवदेवतांनी वेगवेगळे वर दिले. त्यामुळे तो सर्वांनाच अजिंक्य झाला. परंतु पुढे आपल्या बालभावानुसार तो ऋषींच्या आश्रमात जाऊन नाना प्रकारची दांडगाई करू लागला. 

शेवटी ऋषींनी आपले नेहमीचे हत्यार बाहेर काढले. त्यांनी हनुमंताला शाप दिला, की `तुझ्या बलाची कुणीतरी आठवण करून देईपर्यंत आपल्या बलाचे ज्ञान तुला मुळीच होणार नाही!'

या शापामुळे हनुमंताला आपल्या बलाचा विसर पडला आणि इकडे ऋषींची तपश्चर्याही निर्वेधपणे सुरू झाली. परंतु पुढे समुद्र उल्लंघनाच्या वेळी जांबुवंताने हनुमंताला त्याच्या बलाची आठवण करून दिली. 

हा प्रसंग `किष्किंधाकांडात' वर्णन केला असून इथूनच पुढे हनुमंताच्या बलदंड व्यक्तिमत्त्वाचा फुलोरा खऱ्या अर्थाने फुलू लागतो. त्याच्या अंगाचे एक एक गुण प्रकट होऊ लागतात आणि पाहता पाहता त्याची व्यक्तिरेखा हिमालयाच्या उत्तुंग शिखराप्रमाणे भव्य दिव्य बनते आणि रामायणाच्या अखेरीस तर त्याला `देवत्त्व' प्राप्त होते.

श्रीरामाच्या परिवारात लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, जांबुवान, सुग्रीव, बिभीषण यासारखी कितीतरी पराक्रमी आणि गुणी मंडळी आहेत, परंतु श्रीरामाप्रमाणे देवत्त्व प्राप्त झाले, ते हनुमंताला! त्यामुळे श्रीरामाची मंदिरे आपल्याला आढळतात, तशीच हनुमंताचीही आढळतात. श्रीरामाच्या परिवारातील अन्य कुणाचीही आढळत नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.