शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भगवान विष्णूने मोहिनी अवतार का घेतला? मोहिनी एकादशीची तारीख व्रत, शुभ वेळ आणि पूजा पद्धत जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 08:00 IST

धार्मिक मान्यता अशी आहे की मोहिनी एकादशीचे व्रत ठेवल्याने सर्व दु: ख दूर होतात आणि व्यक्ती सर्व बंधने व आसक्ती यापासून मुक्त होते. 

हिंदू धर्मानुसार, मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाचे विधिने पूजन केले असता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात एकादशी दोनदा येते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. यंदा २३ मे रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी व्रत कर्त्याने पूर्ण दिवस उपास करावा आणि भगवान विष्णूंची उपासना करावी. मोहिनी एकादशीला भगवान विष्णूचे मोहिनी रूप मानले जाते. धार्मिक मान्यता अशी आहे की मोहिनी एकादशीचे व्रत ठेवल्याने सर्व दु: ख दूर होतात आणि व्यक्ती सर्व बंधने व आसक्ती यापासून मुक्त होते. 

भगवान विष्णूनी मोहिनीचे रूप धारण का केले, त्याची कथा-

हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, समुद्र मंथनानंतर बाहेर ;पडलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला. हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली. मग राक्षसाचे लक्ष कलशांच्या अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. भगवान विष्णूचे सुंदर स्त्रीरूप  पाहून राक्षस आकर्षित झाले. त्यावेळेस देवांनी अमृत प्राशन केले. ही घटना वैशाख महिन्याच्या शुक्ल एकादशीला घडली असे म्हणतात. तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. व या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते.

पूजेची पद्धत

मोहिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी सकाळी उठून स्नान करावे. त्यानंतर, पूजास्थळावर बसून भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा यांची पूजा करावी. भगवान विष्णूला प्रिय असणारी तुळशी, फुले, फळे वहावीत. विष्णू सहस्त्र नाम म्हणावे किंवा ऐकावे. ओम नमो भगवते वासुदेवाय, हा १०८  वेळा जप करावा. त्यानंतर विष्णूची किंवा विठ्ठलाची आरती करावी. पूर्ण दिवस उपास करावा. गरजूंना अन्नदान करावे. दुसर्‍या दिवशी देवपूजा करून उपास सोडावा.