शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रामराज्य असो नाहीतर स्वराज्यनिर्मिती, भागवत धर्माने भगव्या ध्वजाला का दिली पसंती? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:17 IST

आजही मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज डौलदारपणे फडकत असतो आणि आपण त्यासमोर नतमस्तक होतो, त्या रंगाचे महत्त्व जाणून घेऊ. 

हिंदू धर्मात केशरी, लाल, पांढरा, पिवळा या रंगाचा अधिकतर वापर केला जातो. हिंदू नवीन वर्षाच्या निमित्तानेदेखील अनेक ठिकाणी गुढीच्या बरोबरीने भगवा ध्वज उंचावला जातो. ही परंपरा रामायणाच्या आधीपासून सुरू आहे. विजयोत्सवाचे प्रतीक असलेला भगवा ध्वज काय दर्शवतो, ते जाणून घेऊया.

केशरी अर्थात भगवा रंग त्याग, बलिदान, ज्ञान, पावित्र्य, सेवा यांचे प्रतीक आहे. सनातन धर्मात साधू संत मुुमुक्षू होऊन मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प करतात, तेव्हाही केशरी वस्त्रे परिधान करतात. वारकरी पंथातही केशरी ध्वज उंचावतात. 

केशरी वस्त्र संयम, संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक मानला जातो. ज्याप्रमाणे पवित्र अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात, त्याप्रमाणे साधू संत आपल्या तपश्चर्येच्या तेजाने तप्त होतात, तेव्हा त्यांची काया केशरी रंगासमान भासते.

केशरी रंग दुर्गा माता, हनुमंत, गणपतीदेखील धारण करतात. त्यामुळे या रंगाबरोबरच त्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त होतात.

रामायण, महाभारत असो नाहीतर शिवरायांचा काळ, त्या सर्वांनी विजयाचा निदर्शक म्हणून भगवा ध्वज फडकवला. सनातन धर्मानेदेखील भगवा ध्वज स्वीकारला. तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला. 

अंधारातही चमकून दिसेल, ही केशरी रंगाची खासियत असते. म्हणून द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटले असतात. याचाच दुसरा अर्थ केशरी रंग अंधारावर, अधर्मावर, अंधश्रद्धेवर मात करणारा आहे, म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो.

केशरी हा सूर्योदयाचादेखील रंग आहे. सूर्य आणि पृथ्वी यांचे घनिष्ट नाते आहे. सूर्योदय झाल्याशिवाय पृथ्वीचे कामकाज सुरू होत नाही, त्याप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाज जीवनाचे चलनवलन होणार नाही. म्हणून हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे.

केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसेच तो मांगल्याचेही प्रतीक आहे. म्हणून नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शोभा यात्रांमध्ये केशरी ध्वज उंचावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपणही आपल्या घरावर, खिडकीवर केशरी ध्वज फडकवून मांगल्याचा उत्सव साजरा करूया.