शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा वाटते की आपली वेळ खराब आहे, तेव्हा वेळेलाही थोडा वेळ द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 12:08 IST

चांगल्या वेळेची आपण सगळेच वाट बघत असतो, पण ती वेळ येण्यासाठी थांबण्याची आपली तयारी नसते. त्यासाठी लांगणारा संयम अंगी बाणला, तर ती वेळही नक्कीच येईल. हेच शिकवणारी छोटीशी गोष्ट!

एका शिष्याने आपल्या गुरुजींना सांगितले, `गुरुजी मी खूप प्रयत्न करूनही मला कशातच यश मिळत नाहीये. काहीतरी उपाय सुचवा, जेणेकरून माझी चांगली वेळ येईल, मलाही चांगले दिवस दिसतील.'

गुरुजी आपल्या शिष्याला घेऊन फेरफटका मारायला बाहेर पडले. शिष्याला वाटले, गुरुजी काहीतरी उपाय सुचवतील. पण तसे झाले नाही. बराच वेळ झाला तरी गुरुजी मुद्द्याचे सोडून अवांतर गोष्टी बोलत होते. मात्र त्याकडे शिष्याचे लक्ष लागेना. तो ऐकल्यासारखे करत मान डोलवत होता. हे गुरुजींच्याही लक्षात आले. 

चालता चालता त्यांनी बरेच अंतर कापले होते. गुरुजी शिष्याला म्हणाले, 'मला तहान लागली आहे, जवळच एक नदी आहे, तिथून माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन येशील का? तोवर मी इथे झाडाच्या सावलीत बसतो.' 

शिष्य लगेच हो म्हणाला. तो नदीच्या शोधात निघाला आणि गावकऱ्यांना विचारत विचारत नदीवर पोहोचला. तिथे जाऊन पाहिले, तर नदीवर बायका धुणे धुत होत्या. गडीमाणसं जनावरं धुत होती. लहान मुलं आंघोळ करत होती. असे गढुळ पाणी आपल्या गुरुजींना प्यायला कसे बरे द्यावे? या विचारात तो मान खाली घालून परत आला. गुरुजींना म्हणाला, 'गुरुजी ते पाणी पिण्यालायक नव्हते, म्हणून मी आणू शकलो नाही. क्षमा करा!'गुरुजी म्हणाले, हरकत नाही. चालून दोघेही दमलो आहोत. तूही इथे सावलीत थोड्या वेळ बस मग परतीच्या वाटेने जाऊ. 

गुरुजींनी पुन्हा अवांतर विषयावर चर्चा सुरू केली. शिष्यही मान डोलवत ऐकल्यासारखे करू लागला. काही वेळाने गुरुजींनी शिष्याला पुन्हा एकदा नदीवर जाऊन पाणी आण सांगितले. गुरुजींची आज्ञा मोडणे शक्य नसल्यामुळे शिष्य परत नदीवर गेला. तिथे जाऊन पाहिले, तर नदीचे पाणी शांत झाले होते. स्थिर झाले होते. सगळा गाळ खाली बसला होता. त्यामुळे नदीतले दगड गोटेही लख्ख दिसत होते. सूर्याची किरणे पडून पाणी चकाकत होते. ते पाहून शिष्याचा विश्वासच बसला नाही, मगाशी पाहिलेले गढूळ पाणी हेच होते का? त्याने पानांचा द्रोण तयार केला आणि त्यात पाणी भरून तो गुरुजींसाठी घेऊन आला.

गुरुजींनी विचारले, `हे त्याच नदीचे पाणी आहे का? जिला तू मगाशी गढूळ म्हणालास?''हो गुरुजी, मगाशी ते पाणी पिण्यालायक नव्हते. आता नदीवर कोणी नव्हते त्यामुळे गाळ खाली बसला. म्हणून वरवरचे स्वच्छ पाणी मी आणू शकलो.' -शिष्यगुरुजी म्हणाले, `मग तुलाही तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले? गढूळ वाटणारे पाणी काही काळ गेल्यावर जर शुद्ध, स्वच्छ दिसू शकते, तशी वाईट वाटणारी वेळ काही काळ गेल्यावर निश्चितपणे चांगली वाटू लागेल. त्यासाठी वेळेलाही थोडा वेळ दे, मग चांगली वेळही येईल हे नक्की!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी