शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा कोणीच तुमची मदत करत नसेल तेव्हा 'या' व्यक्तीची मदत मागा, ती नक्की मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:00 IST

थोरामोठ्यांच्या म्हणण्यानुसार, माणसाला सतत प्रश्न पडत राहणे, हे प्रगतीचे लक्षण आहे. परंतु आपण जस जसे मोठे होत जातो, तसतसे ...

थोरामोठ्यांच्या म्हणण्यानुसार, माणसाला सतत प्रश्न पडत राहणे, हे प्रगतीचे लक्षण आहे. परंतु आपण जस जसे मोठे होत जातो, तसतसे आपले कुतूहल वाढण्याऐवजी कमी कमी होत जाते. आपण आपल्या बुद्धीचा वापर कमी करतो आणि सांगकाम्यासारखे इतर सांगतील त्याचे अनुकरण करतो. त्यामुळे अनेक प्रश्न मनातल्या मनात विरून जातात किंवा अनुत्तरित राहतात. परंतु, अशी एक व्यक्ती आहे, जी आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकते. ती व्यक्ती कोण, ते या कथेतून जाणून घेऊया.

एक शिष्य भगवान बुद्धांजवळ आला आणि म्हणाला, `भगवान, मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. आपले मन शांत कसे ठेवावे?'भगवान सांगतात, `मी आता एका कामात व्यस्त आहे, तू आश्रमातल्या दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला जाऊन हा प्रश्न विचार.'शिष्य जातो. वयाने आणि अनुभवाने मोठे असलेल्या एका व्यक्तीला तोच प्रश्न विचारतो. ती व्यक्ती सांगते, `माझे सकाळपासून डोके दुखत आहे. आता मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तू आणखी कोणाकडे जा. तुला उत्तर मिळेल.'शिष्य आणखी एक-दोघांना जाऊन भेटतो. पण सगळ्यांची आज अचानक डोकेदुखी, पोटदुखी, मानदुखी वाढलेली असते. शिष्य वैतागून भगवान बुद्धांजवळ येतो आणि सांगतो, `भगवान, आपल्या सांगण्यानुसार आश्रमातल्या तीन ज्येष्ठ व्यक्तींजवळ गेलो. तिघांनीही कारणे देऊन मला परतावून लावले. आता मी कोणाकडे जाऊ? म्हणून तुमच्याकडे परत आलो.'

भगवान म्हणतात, `अरे, त्या तिघांनी तुला उत्तर दिले, पण तूलाच ते कळले नाही. तिघे त्यांच्या व्यापात असल्याने त्यांनी सांगितले, तू आणखी कोणाकडे जा. ही व्यक्ती आणखी कोणी नसून, ती तू आहेस. तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लोकांकडे वेळ नाही. तुझी उत्तरे तुलाच शोधायची आहेत. आणि तुला ती निश्चित मिळतील. यासाठी तुला तुझ्या अंतर्मनात डोकावले पाहिजे. आत्मसंवाद साधला पाहिजे. मनाचा आवाज ऐकला पाहिजे. ते शिकलास, की तुला तुझी उत्तरे मिळू लागतील.'

संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात त्याप्रमाणे, `तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी!' आपल्या प्रश्नांचा शोध आपण स्वत:मध्ये घेतला पाहिजे. स्वत:ला समजून घेतले पाहिजे. दुसरे सांगतात म्हणून नाही, तर कोणतीही गोष्ट आपल्याला पटत आहे का याची शाहनिशा केली पाहिजे. 

एखाद्या गोष्टीचा शोध घेत आपण गावभर फिरतो, दुसऱ्यांचे मार्गदर्शन घेतो, सल्ले घेतो, पण मनाचा कौल घ्यायला विसरतो. दिवसभरातील काही क्षण जर स्वत:शी हितगुज केली नाही, तर फार मोठा संवाद आपण गमावत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण, सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आपण स्वत:च असतो!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी