शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

धुंधुरमास कधीपासून सुरू होत आहे? त्याचे नेमके वैशिष्ट्य काय? सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 07:30 IST

धुंधुर मास शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर अर्थात २१ डिसेंबर पासून सुरू होईल. त्याबद्दल सविस्तर वाचा!

वसंत, ग्रीष्म, वर्षा ऋतू ही देवीची रूपे आहेत, तर शरद, हेमंत, शिशिर ही देवांची रूपे मानली जातात. शिशिरात कडाक्याची थंडी पडते. दिवस छोटा होऊ लागतो. सकाळी धुक्याची चादर आणि सायंकाळी मिट्ट अंधार. अशात सूर्याचे कोवळे ऊन फार उबदार वाटते. पानाफुलांवरून दवाचे थेंब ओघळू लागतात. पानगळीचा मौसम सुरू झालेला असला, तरीदेखील धरित्री जणू काही जीर्ण वस्त्र टाकून नवयौवनेप्रमाणे तजेलदार भासू लागते. निसर्गाची ही कूसबदल म्हणजेच धुंधुर मास!

शिशिर ऋतूमध्ये सूर्याचे महत्त्व अधिक जाणवू लागते. म्हणून याच काळात सूर्यपूजेशी निगडित अनेक व्रत, पूजा, उत्सव, सण साजरे केले जातात. या उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचा विधी पार पाडला जातो आणि निसर्गाशी जवळीक साधली जाते. अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, रसरशीत फळे बाजारात आलेली असतात. ती पाहून आणि खाऊन तनामनाला उभारी येते. 

शिशिर ऋतु येताच हिवाळा अधिक गडद जाणवू लागतो. त्यालाच धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात भूक खूप लागते, परंतु पचनशक्तीचा वेग मंदावत जातो. त्यामुळे आरोग्यवर्धक आहार डोळसपणे घेतला पाहिजे, यावर आहार तज्ज्ञांचा भर असतो. मात्र, याच काळात व्यायामावर भर देण्याकडेही लक्ष दिले जाते. नवीन वर्ष, गारवा, थंडी, धुके हे सर्व निमित्त साधून प्रभात फेरीची सुरुवात होते. हा काळ आरोग्याच्या कमाईसाठी अनुकूल ठरतो. उत्तरायणाची सुरुवात झालेली असत़े  वर्षभरासाठी सूर्य नमस्काराचा संकल्प देखील केला जातो.

 

याच काळात अनेक धन धान्य शेतातून घरी आलेली असतात. हे सर्व काही देवाच्या कृपेने प्राप्त झाले, या श्रद्धेने बळीराजा ते देवाला अर्पण करतो. त्यानिमित्ताने अनेक सोहळे साजरे केले जातात. असा हा धुंधुर मास शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर अर्थात २१ डिसेंबर पासून सुरू होईल. 

या सर्व गोष्टींबरोबर इंग्रजी वर्षाची सांगता काही दिवसांवर येऊन ठेपलेली असल्यामुळेही, २०२१ ला निरोप देण्यासाठी लोक अगतिक झाले आहेत. त्याचवेळेस २०२२ च्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. तूर्तास आपण हेमंत सरून सुरू होणाऱ्या  शिशिराचे सोहळे अनुभवूया आणि प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करूया.