शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जे आहे, ते बदलेलच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 05:08 IST

एक साधा प्रश्न नेहेमी आपल्या मनात ठेवावा. कोणताही प्रसंग समोर आला (त्रास देणारा किंवा आनंदी करणारा) की हळूच आपल्या मनाला विचारावे.. ‘यामागे नक्की कुठला आशीर्वाद असेल बरं?

- धनंजय जोशीझेन साधनेतले सौंदर्य म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमधून आपल्याला शिकवण मिळून जाते. बुद्धाने सांगितले होते, सतत सर्व काही बदलत जात असते.. काहीच स्थायी नाही.त्याला इंग्लिश शब्द आहे ‘इम्पर्मनन्स’! आपण जर नीट लक्ष देऊन बघितले तर आपल्याला ते सहज समजून येईल. समजा आपण सकाळी कामाला निघालो आणि वाटेत एक छानपैकी ट्रॅफिक जॅम लागला. गाडी अडकलेली ट्रॅफिकमध्ये ! आपल्या मनामध्ये काय काय विचार येत असतील ते बघावे. आधी राग येतो. का?- हे माझ्याच वाट्याला का, अशा विचाराने ! मग आपल्या पुढे असलेला ड्रायव्हर गाडी इतक्या हळू का चालवतोय म्हणून आणखी राग ! एक ना दोन विचारांची माळ लागून जात असते. पण या रागाने तडतडण्यामागचे खरे कारण काय?- तर, जे आहे ते स्वीकारून आपण शांत बसू शकत नाही, हे ! हा ट्रॅफिक जॅम कायम असणार नाही हे साधे सत्य आपण का समजून घेत नाही? अशा वेळी माझे गुरु सांगायचे, ‘जस्ट फोकस आॅन युअर ब्रेथ - फक्तश्वासाकडे लक्ष द्यावे, आपल्या मनामध्ये जे काही विचार येत असतील त्यांच्याकडे बघावे. मग आपल्याला आपोआप समजून येईल, ‘अरे, हे सगळे केव्हातरी बदलणार. मग मीच माझ्या मनाला उगाचच त्रास कशाला करून घेऊ? बघूया तरी पुढे काय होते ते !’- असे म्हटले, तर आपण स्वत:कडे बघून हसू लागतो. माझे गुरु सांगायचे, ‘प्रत्येक अनुभवामागे एक सुंदर शिकवण असते. त्याला आपण एक प्रकारचा आशीर्वाद मानायचा असतो. मग तो अनुभव कितीही कठीण, त्रासदायक, मनाला निराश करणारा, गोंधळून टाकणारा असो ! तो अनुभव म्हणजे वर्तमानाचे खरे स्वरूप - ‘इम्पर्मनन्स’ - समजून घेण्याची आणि आत्मसात करण्याची संधी असते!’एक साधा प्रश्न नेहेमी आपल्या मनात ठेवावा. कोणताही प्रसंग समोर आला (त्रास देणारा किंवा आनंदी करणारा) की हळूच आपल्या मनाला विचारावे..‘यामागे नक्की कुठला आशीर्वाद असेल बरं?