शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न? पण खरंच का? जाणून घ्या नाकाबद्दल काय सांगते समुद्रज्योतीष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 18:18 IST

समुद्र शास्त्राने सरळ आणि लांब नाकाची ठेवण भविष्याच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने श्रेष्ठ मानली आहे. 

नाक हा सुंदर आकर्षक व्यक्तिमत्त्वात भर घालणार मुख्य घटक असतो. प्रत्येकाच्या नाकाची ठेवण वेगवेगळी असते. एवढेच काय तर नाकावरून आपल्याकडे प्रसिद्ध म्हण आहे, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न! ही विघ्न का? तर केवळ नकटे नाक असते म्हणून का? तर नाही! समुद्र ज्योतिष नाकाच्या ठेवणीवरून सांगते आपले व्यक्तिमत्त्व, भविष्य आणि स्वभाव. आपापल्या नाकाची ठेवण आपल्याला माहित आहेच, चला आता नाकावरून भविष्यही जाणून घेऊ. फक्त हे वाचून नाकावर राग येऊ देऊ नका म्हणजे झालं!

>> ज्यांचे नाक सरळ असते, ते लोक आपल्या मनातल्या गोष्टी कोणालाही पटकन सांगत नाहीत. आपल्या प्रश्नांची उत्तरं यशस्वीपणे स्वतःच शोधतात. असे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे कमनशिबी असतात. 

>> ज्यांच्या नाकाचा शेंडा थोडा वरच्या बाजूने ओढलेला असतो, अशा लोकांमध्ये आत्मविश्वास चांगला असतो. त्यांच्यात नेतृत्त्वाचे गुण असतात. ते शीघ्रकोपी असतात पण राग लवकर जातोसुद्धा! त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. 

>> ज्यांचे नाक पोपटासारखे थोडे खालच्या बाजून झुकलेले असते, असे लोक स्वभावाने गंभीर असतात. त्यांना राग पटकन येतो आणि तो राग ते दीर्घकाळ डोक्यात ठेवतात. ते अतिशय मेहनती असतात आणि करिअर बाबतीत त्यांना हलगर्जीपणा जराही चालत नाही. 

>> नकटे व चपट्या नाकाचे लोक कलाकार असतात. पण त्यांचा मुख्य स्वभाव दोष म्हणजे चंचलता. घटकेत राग घटकेत आनंद. अशामुळे त्यांना त्यांच्याच वागण्या बोलण्याचे ताळतंत्र सांभाळता येत नाही. मात्र कोणताही निर्णय घेताना ते अतिशय विचारपूर्वक घेतात. 

>> छोट्या नाकाचे लोक आपल्या आयुष्यात अगदी आनंदी असतात. मात्र त्यांना चारचौघात उठबस करण्याची हौस जरा कमीच असते. 

>> सरळ आणि लांब नाकाचे लोक भाग्यवान असतात. दिसण्याच्या बाबतीत, नशिबाच्या बाबतीत, मिळकतीच्या बाबतीत अग्रेसर असतात. त्यांचे आयुष्य इतरांच्या तुलनेत आनंदाचे आणि समाधानाचे असते. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे ते लोकप्रिय असतात.