शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
2
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
3
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
4
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
5
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
6
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
7
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
8
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
9
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
10
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
11
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
12
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
13
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
14
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
15
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
16
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
17
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
18
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
19
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
20
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खरे सौंदर्य कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:11 IST

मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?

- नीता ब्रह्मकुमारीआजचे युग स्पर्धेचे आहे. अनेक स्पर्धांमध्ये मनुष्य कळत-नकळत भाग घेत आहे. रूप आणि रूपया या दोघांची स्पर्धा अधिकच दिसून येते. आज व्यक्तीची पसंद आणि ओळख या दोन गोष्टींनीच केली जाते. कधीकाळी एखाद्या व्यक्तीची निवड त्याच्या गुणांनी, संस्कारांनी होत असे; पण आज गुण असो वा नसो, रूपवान असणे गरजेचे मानले जाते. बुद्धी असो वा नसो, धनवान हवे ही मान्यता सगळ्यांमध्ये दिसून येते; परंतु खरे सौंदर्य कोणते? आज जागोजागी ब्युटीपार्लर आहेत. सौंदर्य टिकविण्यासाठी खटाटोप केला जातो; पण कोणते सौंदर्य जपावे याची समज नाही. लहानपणापासून चांगले दिसावे यासाठी खूप काही केले; पण चांगले बनण्यासाठी काय करावे हे कोणी सांगितले नाही. अष्टावक्र, सूकरात, अब्राहम लिंकन यांनी आपल्या गुणसौंदर्य, विचारसौंदर्य आणि जीवनसौंदर्याने बाह्यसौंदर्यावर मात केली. एखाद्या व्यक्तीने महान कार्य केले तर आपण त्याचा गुणगौरव करताना श्रीफळ अर्थात नारळ देतो. देवळातसुद्धा भगवंताला श्रीफळ चढविले जाते. या नारळाला ‘श्रीफळ’ म्हणण्यामागचा उद्देश बघितला तर आंतरिक सौंदर्यच आहे. बाहेरून कितीही कुरूप दिसत असणारे आतून किती गुणवान असू शकते, याचे दर्शन या श्रीफळाने होते. एकदा जनक राजाने दरबारात विद्वानांची सभा बोलावली. त्या सभेत अष्टावक्र याचे आगमन झाले. पूर्ण सभा हसू लागली. त्यांचे हसणे बघून अष्टावक्रसुद्धा हसू लागले. राजा जनक यांना हसण्याचे कारण मात्र कळलं नाही. ते त्या विद्वानांना विचारतात की, तुम्ही का हसत आहात? विद्वान उत्तर देतात की, ‘या विद्वानांच्या सभेत वेड्या-वाकड्या अंगाच्या व्यक्तीला बघून हसू सुटले.’ मग राजा जनकने अष्टावक्रला हसण्याचे कारण विचारले. अष्टावक्र उत्तरले, ‘राजा मला वाटले की तू विद्वानांची सभा बोलावली आहेस; पण ही तर मुर्खांची सभा आहे. मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?