शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घरातून निघताना अपघाताचे विचार मनात आले तर काय कराल? प्रेमानंद महाराजांनी सांगितला उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:14 IST

Premanand Maharaj Accident Speech: आजकाल अशी परिस्थिती आहे की रस्ते खड्डेमय आहेत, खड्डे चुकविताना दुसऱ्याच वाहनाच्या चाकाखाली जायची भीती आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अशा वातावरणात अपघाताचे विचार डोकावतात...

अनेकदा घरातून निघताना अपघात होण्याचे विचार मनात डोकावत असतात. आजकाल अशी परिस्थिती आहे की रस्ते खड्डेमय आहेत, खड्डे चुकविताना दुसऱ्याच वाहनाच्या चाकाखाली जायची भीती आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. कोणीही कसाही आडवा येतो आणि अपघात होतात. स्पीडब्रेकर तर अशा प्रकारे बनविले जातात की परदेशातल्या लोकांनी इथे येऊन इंजिनिअरिंगची पीएचडी करावी. अशा वातावरणातून गाडी चालवत ऑफिस किंवा कामाचे ठिकाण गाठत असताना आपल्याला काही होणार तर नाही ना, गाडीचा अपघात झाला तर असे विचार मनात हळूच डोकावतात आणि चिंता वाढवितात. अशा वेळी काय करावे असा प्रश्न वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार प्रेमानंद महाराज यांना विचारण्यात आला. 

वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार प्रेमानंद महाराज जी यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लोक दूरदूरून येतात. त्यांच्या सत्संगाचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत राहतात. अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी घराबाहेर पडताना अपघाताची भीती वाटत असेल तर काय करावे हे सांगितले आहे.

यावर प्रेमानंद महाराजांनी देवाचे नामस्मरण करावे, येणारी सर्व संकटे दूर होतात असे सांगितले आहे. यासाठी त्यांनी एक उदाहरणही दिले आहे, जे त्यांच्या भक्तांसोबत घडले आहे. अपघात होतानाही देव आपल्याला वाचवेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

आपले काही लोक गिरीराजची परिक्रमा करून रात्री उशिरा येत होते. आणि ड्रायव्हर झोपला. रात्रीचे दीड-दोन वाजले होते. गाडी डिव्हायडरवर चढली. आतल्या लोकांनी मोठ्याने राधे श्याम असे नामस्मरण केले. मागून बराच वेळ गाडी आली नाही. गाडी पलटलीही नाही. या काळात मागून गाडी आली असती, ठोकून गेली असती. ड्रायव्हर उतरला, माफी मागू लागला, असे महाराजांनी सांगितले. 

देवाचे नाव घ्या, आजपर्यंत कोणाला दगाफटका झाला नाही. देवावर विश्वास ठेवू पहा. पण त्या वेळी देवाची आठवण येत नाही. अभ्यास नसतो ना. तेव्हा संसाराची आठवण येते. अंतर्मनातून आवाज द्या, आम्ही तर आयुष्यभर तेच करत आलो आहोत, असा सल्ला महाराजांनी दिला आहे.  

टॅग्स :Accidentअपघात