शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हिवाळ्यात आहार कसा असावा? तर,बाप्पासारखा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 17, 2020 14:14 IST

बाप्पाला मोदक आवडतो, पंचखाद्य आवडते, लाडू आवडतात, ऊसाचे कर्वे आवडतात. या पदार्थांचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल, की हे सगळे पदार्थ सकस आहारांतर्गत येतात.

ज्योत्स्ना गाडगीळ 

आपण काय खातो, कसे खातो, कधी खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून असते. एखाद दिवसासाठी अन्न सोडले, तर त्याला लंघन म्हणता येईल, परंतु स्वास्थ्यबदलासाठी कायमचे उपाशी किंवा अर्धपोटी राहणे प्रकृती अस्वास्थास कारणीभूत ठरेल. म्हणून वैद्यकीय शास्त्रातसुद्धा संतुलित आहाराचा पर्याय सुचवला जातो. त्यातही इतर आहार पद्धतींच्या तुलनेत भारतीय आहार पद्धत अतिशय योग्य आहे, असे वैद्यकियदृष्ट्यादेखील सिद्ध आहे. म्हणून, सकस आहार कसा असावा? तर बाप्पासारखा.

हेही वाचा :अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...

बाप्पाची तुंदिल तनु प्रतिमा पाहून, अनेकांना तो स्थूल, बोजड वाटतो. मात्र, तो स्थूल दिसत असला, तरी अतिशय चपळ आहे. हे आजवर त्याने युद्धभूमीवर कायम सिद्ध केले आहे. शिवाय, तो कधीही आळसावलेला दिसत नाही. उलट आपण त्याला मंगलमूर्ती, वरदविनायक, तेजोनिधी अशा नावांनी संबोधतो. याचे कारण, बाप्पाची आहारशैली. बाप्पाला मोदक आवडतो, पंचखाद्य आवडते, लाडू आवडतात, ऊसाचे कर्वे आवडतात. या पदार्थांचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल, की हे सगळे पदार्थ सकस आहारांतर्गत येतात. ज्यात गूळ, खोबरे, साजूक तूप, फळे, सुका मेवा, अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश होतो. हे सर्व घटक शरीराला गुणकारक आहेत. या पदार्थांनी पोट भरलेले राहते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि खाऊन सुस्तपणादेखील येत नाही. तसेच या खाद्यपदार्थांनी मेदवृद्धी न होता, अंगात उत्साह निर्माण होतो. 

म्हणून तर हिवाळ्यात दिवाळीचा, दत्तजयंती, संक्रांतीचा सण येतो. फराळातून शरीराला आवश्यक घटकांची पूर्तता होते, दत्तजयंतीला पंजिरीच्या प्रसादातून सुंठ, खडीसाखर पोटात जाते, तर संक्रांतीला तीळ, गूळाची स्निग्धता शरीराला लाभदायक ठरते. दरम्यान संकष्टीच्या निमित्ताने मोदकांचा प्रसादही भरीला असतोच. आपल्या पूर्वजांनी सण-उत्सव-संस्कृती-परंपरा यांची कशी उत्तम सांगड घातली आहे, हे यावरून जाणवते. त्याचीच उजळणी बाप्पा त्याच्या व्यक्तीमत्त्वातून आपल्याला करून देतो.

गणपती बाप्पाचे शरीर सौष्ठव इतर देवतांसारखे नसले, तरी बाप्पाने आरोग्याच्या बाबतीत कधीच हेळसांड केली नाही. उलट तो घेत असलेला आहार, अतिशय आदर्श आहे. आताच्या काळात सांगायचे झाले, तर बाप्पा हेल्दी डाएट घेणारा आहे. याचे वर्णन मराठीतील प्रसिद्ध कवी, शिवदीनी केसरी यांनी एका पदात केले आहे,

देवा प्रचंड गजतुंडा, अभयवरावरी उचलिसी शुंडा,सिंदुर चर्चित विराजितोसी, एकदंत बरवा दिसतोसी,पूज्य मानव तू नवहि खंडा, मोदक लाडू इक्षुदंड कि, पंचखाद्य नैवेद्य मोदकी, सिद्धान्नाचे फार खोडकी, स्वभक्त प्रेमाद्भुत अखंडा, सकळ कळा विद्या तुजपासि,म्हणवुनि जन हे सर्वासि, सगुण निर्गुण स्वरूपासि,दाविसी परि तू न नव्हेसि दुखंडा, केसरि गणनाथा शिवदिन,कृपा कटाक्षे करि सुदिन, देही स्मरणा पदोपदिना,ओमकार मुळ मुख्य अखंडा।।

शब्द अलंकारांनी हे पद अतिशय लयबद्ध झाले आह़े  त्यात केलेले वर्णन अतिशय साधे पण सुंदर आह़े  बाप्पाचे विराट रूप आहे. तो आपल्या भक्तांना अभय देतो. सिंदुर चर्चित आणि एकदंत असूनही तो अतिशय साजिरा दिसतो. 

आपणही बाप्पाचा आदर्श बाळगून आरोग्यदायी जीवनासाठी डोळसपणे आहार घ्यायला हवा. मात्र, आताच्या काळात आपल्याला तुंदिल तनु मानवणारी नाही, त्यामुळे आहाराला व्यायामाची जोड दिली, तर उत्तम स्वाथ्याची आणि सात्विक गुणांची, विचारांची आपल्याला निश्चितच कमाई करता येईल.

हेही वाचा : पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती!