शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अति विचार थांबावायचे असतील तर काय करता येईल? मानसशास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:11 IST

विचार दोन प्रकारचे असतात. एक प्रश्नार्थक विचार आणि दुसरे पर्यायात्मक विचार. आपल्याला विचारांसाठी दुसरा पर्याय निवडायचा आहे.

आज अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या आहे, ती म्हणजे अति विचार. अति विचारांमुळे मनुष्य सतत काळजीत राहतो. ही काळजी त्याला पोखरते आणि तो नैराश्यात जातो, मानसिक आजारांना बळी पडतो. अति विचार करणे वाईट नाही. शास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, अभ्यासक अति विचार करतात, परंतु त्यांच्या विचारांची दिशा योग्य असते. याउलट आपण मात्र चुकीच्या दिशेने विचार करून अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल काळजी वाहत राहतो. 

एक धनिक गुरुंजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, 'गुरुदेव, विचार करून करून माझे डोके भणाणून जाते. ते थांबवण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.' गुरुदेवांनी त्याच्या हाती एक चमचा दिला आणि त्याला घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले. धनिकाला वाटले, गुरुजी आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असतील. बराच वेळ सागरी लाटांकडे पाहिल्यावर एका क्षणी गुरुदेव म्हणाले, `वत्सा, हा समुद्र तुला दिसतोय ना, तो तुला हातातल्या चमच्याने वेचत विरुद्ध बाजूला आणायचा आहे. तसे केल्याने तुझे विचार आपोआप संपतील.' हे ऐकून धनिक चक्रावला, म्हणाला, `गुरुदेव, माझी पूर्ण हयात या कामात निघून जाईल, तरी हा समुद्र इवल्याशा चमच्याने इकडचा तिकडे हलायचा नाही.' यावर हसत गुरुदेव म्हणाले, `वत्सा, एवढे तर कळतेय ना? मग या समुद्राकडे बघ. विचारांचा सागर असाच आहे. त्याला भरती ओहोटी येत राहणार. तू चमचा चमचा प्रयत्न सुरू कर. समुद्र नाही, तर किमान तळे तरी साठेल! म्हणून अतिविचार सोडून दे आणि कामात स्वत:ला गुंतवून घे.'  वरील गोष्टीवरून आपल्यालाही हाच संदेश मिळतो, की नुसता विचार करून उपयोग नाही, त्याला कृतीची जोड द्यायला हवी. परंतु नुसत्या विचारांना बांध कोण घालणार? विचार करू नका म्हटले, की शेकडो विचार येतात. शेकडो विचारांना हजारो फाटे फुटतात. विचारांची ही अखंड साखळी आहे. परंतु त्यातून निष्पत्ती काय? तर शून्य! उलट, अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातही नसतात...!

हे विचार थांबवायचे तरी कसे? विचारांना चालू, बंद करण्याचे बटण नाही. ते सुरूच राहतात. अशात कोणी फार विचार करू नको असा सल्ला दिला, की विचारांना आणखी चार चाके जोडली जाऊन विचारांची गती वाढते. मग प्रश्न पडतो, विचार करणे ही प्रक्रिया चांगली म्हणावी की वाईट?

विचार करणे चांगलीच बाब आहे, परंतु अति विचार वाईटच! नुसता विचारही वाईटच! मग विचार साखळीचा मध्य कसा गाठावा? तर विचारांची दिशा योग्य आहे की योग्य हे ठरवून! आपल्याला चांगले, वाईट यातला फरक कळतो. आपण आपल्या वैयक्तिक रागा-लोभापायी विचारांकडे तटस्थपणे बघणे विसरतो. ती कला अवगत करायला हवी, म्हणजे विचारांचे संतुलन करता येते.

आपल्याला वाटते, आयुष्यातील प्रश्न संपले, म्हणजे अति विचारांचे चक्र थांबेल. परंतु, हे सत्य नाही. कारण, दरदिवशी नवे प्रश्न निर्माण होत राहणार आहेत. मग, या प्रश्नांची उकल काढत बसण्यात आयुष्य वाया घालवायचे का? प्रश्न सोडून द्यायचे का? दुर्लक्ष करत जगायचे का? तर नाही! विचारांची दिशा बदलायची. केवळ सकारात्मक दृष्टीकोन उपयोगाचा नाही, तर प्रश्न सोडवण्यासाठी आधी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. वास्तवदर्शी अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे अपेक्षाभंग होत नाही आणि अति विचारांना खतपाणी मिळत नाही. 

विचार दोन प्रकारचे असतात. एक प्रश्नार्थक विचार आणि दुसरे पर्यायात्मक विचार. प्रश्नार्थक विचार न थांबणारे आहेत. त्यांचा विचार करून हाती काहीच लागणार नाही. याउलट पर्यायांचा विचार करून कामाला सुरुवात केली, तर प्रश्न आपोआप सुटत जातील. आपल्याला पर्यायाचा विचार करून प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि पर्यायाने आयुष्यही!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य