शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मृत्यूला हुलकावणी द्यायला गेला आणि मृत्यूमुखी पडला; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 18:58 IST

भगवान श्रीकृष्ण गीतेत कृष्णाला सांगतात, पुढे काय होईल याची काळजी करू नकोस, तो भार देवावर टाक आणि तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा...!

'समय से पेहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलने वाला!' हे वाक्य आपण कधी ना कधी वाचले असेलच. या वाक्याचे मर्म समजून घेतले, तर आपली अतिकाळजी करण्याची चिंताच मिटून जाईल. पण तसे होत नाही, आपण अकारण काळजी करत बसतो आणि घडते भलतेच!

एकदा एक तरुण सकाळी झोपेतून उठतो डोळे उघडतो, तर समोर यमराज उभे असतात. त्यांना पाहून तो घाबरतो. यमराज म्हणतात, `चल मी तुला न्यायला आलोय. आजच्या यादीत पहिले नाव तुझे आहे.'

हे ऐकून तो तरुण गोंधळून जातो. आज, आत्ता, ताबडतोब निघायचे? कोणालाही न भेटता? घरच्यांचे, मुला बाळांचे काय होईल. किमान एक दिवस मिळाला असता, तर घरच्यांची पुढची व्यवस्था तरी लावून गेलो असतो. काहीही करून यमराजांना हुलकावणी दिली पाहिजे असा त्याच्या मनात विचार येतो. 

तो यमराजाला म्हणतो, `यमराज मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा प्रत्येकाला विचारली जाते ना? मी फार काही मागत नाही. पण सवयीप्रमाणे एक कप चहा पितो मग सोबत येतो.'

एवढी शुल्लक बाब पूर्ण करण्यासाठी यमराज होकार देतात. तरुण स्वत:साठी आणि यमराजांसाठी चहा बनवतो. यमराजांच्या चहात झोपेचे औषध टाकतो. चहा पिऊन यमराजांना डुलकी लागते. तेवढ्या वेळात तो त्यांच्या यादीतले पहिले नाव खोडून सर्वात शेवटी स्वत:चे नाव लिहितो. तो विचार करतो, जायचे तर आहेच, किमान यमराज बाकीच्यांना घेऊन येईपर्यंत पूर्ण दिवस तरी मिळेल.

यमराज झोपून उठतात. तरुण जाण्याची तयारी दाखवतो. यमराज म्हणतात, `लोक मला पाहून शिव्या घालतात. तू माझे स्वागत केलेस. मी खुष झालो आहे. आजच्या यादीची सुरुवात मी शेवटून पहिली करतो.'

पाहतो तर शेवटून पहिले नाव तरुणाचे असते. त्याच्या आगाऊपणाबद्दल यमराज रागवतात आणि तडक त्याला घेऊन स्वर्गलोकी जातात. तिथे भगवान विष्णू आणि चित्रगुप्त यांच्याशी तरुणाची गाठ पडते. चित्रगुप्त म्हणातात, `तू देवकार्यात अडथळा आणून चूक केलीस. तुझा मृत्यू आज तसाही टळणार होता, पण तू तो ओढावून घेतलास.' यावर भगवान विष्णू म्हणतात, हे मानवा,

'तू ते करतो, जे तुला आवडते,पण होते तेच, जे मला आवडते,म्हणून तू ते कर, जे मला आवडते,मग तेच होईल, जे तुला आवडते!!!'

म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेत कृष्णाला सांगतात, पुढे काय होईल याची काळजी करू नकोस, तो भार देवावर टाक आणि तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा...!