शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:16 IST

Vat Purnima 2025: १० जून रोजी वटपौर्णिमा आहे, त्यानिमित्त आपण अशा पाच वटवृक्षांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला महिलांनीच नाही तर पुरुषांनीही फेऱ्या मारल्याच पाहिजेत!

एखादा विस्तीर्ण पसरलेला वटवृक्ष पाहिला, की आपल्याला तो पुराणपुरुषासमान भासतो. आजही अनेक वृक्ष अस्तित्वात आहेत, ज्यांचे आयुर्मान शे-पाचशे हुन अधिक वर्षे आहे. वनस्पती तज्ञांनी याची पुष्टी दिली आहे. अशाच वृक्षांपैकी काही वटवृक्ष हजारो वर्षांपूर्वी देवी देवतांनी लावले आहेत. पैकी पाच वटवृक्ष प्रसिद्ध आहेत. ते कोणते व कुठे आहेत, ते वटपौर्णिमेनिमित्त(Vat Purnima 2025)जाणून घेऊ. 

Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!

हिंदू शास्त्रात वटवृक्षाला अतिशय महत्त्व आहे. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करतात. असे जुने वटवृक्ष पाहिले, की आपले हात विनम्रतेने जोडले जातात. पंचवट, अक्षयवट, वंशीवट, बौद्धवट आणि सिद्धवट हे प्राचीन वटवृक्ष मुख्यतः पुजले जातात. 

नाशिक येथे पंचवटी क्षेत्रात सीता मातेच्या गुहेजवळ पाच वटवृक्ष आहेत. त्या जुन्या वटवृक्षांवरून त्या क्षेत्राला पंचवटी अशी ओळख मिळाली आहे. वनवासाच्या कालावधीत प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी काही काळ तिथे वास्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे. 

मुगल काळात हिंदूंच्या श्रद्धेवर घाव घालण्यासाठी प्राचीन वृक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तो प्रयत्न असफल ठरला. कारण वटवृक्ष जितका बाहेर विस्तृत दिसतो, तेवढाच तो जमिनीच्या आत घट्ट रुतलेला असतो. पंचवटी परिसरात ते प्राचीन वटवृक्ष आजही पाहायला मिळतात. अन्य वटवृक्षाची परिस्थिती काय आहे पाहूया. 

Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

उज्जैनच्या भैरवगड येथे शिप्रा नदीच्या तटावर सिद्धवट स्थान आहे. त्याला शक्तिभेद तीर्थ असेही म्हणतात. हिंदू पुराणात या स्थानाचा महिमा कथन केला आहे. सिद्धवटचे पुजारी पंडित नागेश्वर कन्हैय्यालाल यांच्या सांगण्यानुसार स्कंद पुराणात म्हटले आहे, की हा वृक्ष माता पार्वतीने लावला होता. त्या वृक्षाला शिव स्वरूप मानून त्याची पूजा केली जाते. पार्वती पुत्र कार्तिकेय यांनी तिथेच तारकासुराचा वध केला होता. 

प्रयाग येथील अक्षयवट, मथुरा वृंदावन येथील वंशीवट, गया येथील गयावट ज्याला बौद्धवट असेही म्हणतात आणि उज्जैन येथे सिद्धवट या वटवृक्षांना अधिक महत्त्व आहे. 

सद्गती अर्थात पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तिथे अनुष्ठान केले जाते. संतती आणि संपत्ती प्राप्तीसाठी सिद्धवट येथील वटवृक्षाला धागा बांधून भाविक नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाला की धागा सोडतात. हा वृक्ष सिद्धी देणारा आहे, म्हणून त्याला सिद्धवट असे म्हणतात. 

Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!

टॅग्स :Vat Purnimaवटपौर्णिमाPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिक