शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

Vastushastra : हातात पैसा टिकत नाही? मग 'हे' उपाय करून बघा; म्हणजे पैसा टिकेलही आणि वाढेलही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 12:16 IST

आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. 

कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल, की माझ्या हातात पैसा टिकत नाही. यासाठी ते आर्थिक जबाबदारी घेणेसुद्धा टाळतात. कदाचित तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही, परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात. अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातली छोटी मोठी खरेदी, कोणाची जुनी देणी वगैरे काहीही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो. एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनःस्ताप होणे स्वाभाविकच आहे. यावर वास्तू शास्त्राने सांगितलेला तोडगा आजमावून बघा. 

आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. 

पैसा एकाजागी ठेवू नका : हा तोडगा वाचताक्षणी तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत. कधी तांदुळाच्या डब्यात, तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माळ्यावर. याचे कारण हेच, की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा  आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँकादेखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तजवीज करतात. वास्तूशास्त्र देखील हेच सांगते. 

घरात सुरक्षितता पैसा कुठे ठेवायचा?वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवतांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते.

घरातला या दिशेला पैसे साठवू नका!वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये. कारण यामुळे धनाची हानी तर होतेच शिवाय संपत्तीची वाढही थांबते. बराचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा आणि हा बिनखर्चिक पर्याय वापरून पैशांची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र