शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VastuShastra :वास्तूमध्ये सूर्यकिरणांचा प्रवेश होण्यासाठी करा 'हे' किरकोळ बदल आणि मिळवा मोठे लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 12:54 IST

Vastu Tips: वास्तूमध्ये केलेले हे किरकोळ बदल तुम्हाला नवीन ऊर्जा देतील हे नक्की!

वास्तू उभारताना पूर्व दिशा पाहिली जाते. जेणेकरून वास्तूमध्ये पुरेपूर सूर्यप्रकाश व्यापून राहावा. जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून आनंद आणि शांतता नांदते. यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. सूर्यप्रकाशाच्या दिशेनुसार घरातील कोणत्या खोलीची जागा कुठे असावी हे जाणून घ्या!

वास्तुशास्त्राच्या पुढील नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये बदल केले, तर त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला काही काळातच दिसून येईल. घरातील आर्थिक, मानसिक, शारीरिक परिस्थितीतही बदल घडताना दिसतील. त्यासाठी या किरकोळ बदलांनी सुरुवात करा. 

>>सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे पहाटे ३-६ हा ब्रह्म मुहूर्त. यावेळी सूर्य घराच्या उत्तर-पूर्व भागात असतो. हा काळ चिंतन आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे ईशान्य दिशेला तुमचे पूजागृह बनवावे.

>>सकाळी ६-९ या वेळेत सूर्य घराच्या पूर्व दिशेलाच असतो, त्यामुळे त्या दिशेने घरात सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करा. त्या दिशेला खिडकी असणे उत्तम, मात्र त्याच्या समोर काही वस्तू ठेवून सूर्यप्रकाशाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवू नका. मोकळी हवा, सूर्यप्रकाश घरात खेळू द्या. त्यामुळे आजार पसरवणारे सूक्ष्म जीव नाहीसे होऊन कुटुंब स्वास्थ्य जपले जाईल. 

>>सकाळी ९-१२ पर्यंत सूर्य घराच्या आग्नेय दिशेला असतो. ही वेळ स्वयंपाकासाठी योग्य आहे. ज्याप्रमाणे पोटाती>>ल अग्नी प्रज्वलित झाल्यावर आपण जेवतो, तसे स्वयंपाक बनवतानाही सूर्यप्रकाशाच्या उजेडात बनवलेला स्वयंपाक आरोग्यासाठी पोषक ठरेल आणि तो बनवताना गृहिणीलाही प्रसन्न वाटेल. 

>>दुपारी १२-३ ही आपल्या विश्रांतीची वेळ असते. अशा वेळी सूर्य माथ्यावर आलेला असतो आणि त्यावेळेस सूर्याची प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणं बाहेर पडतात, त्यामुळे विश्रांती दरम्यान खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावून ती किरणं घरात येण्यापासून आळा घालावा. 

>>अभ्यास व कामाची वेळ दुपारी ३-६ अशी असून त्यावेळेस सूर्य नैऋत्य भागात असतो. त्यामुळे स्टडी रूम किंवा लायब्ररीसाठी ही दिशा उत्तम ठरते. 

>>सूर्यास्ताची वेळ न्याहारी किंवा काही जणांसाठी जेवणाची वेळ असते. सूर्यास्ताचा प्रकाश, वेळ थोडी हुरहूर लावणारी असल्याने ती वेळ टाळून किंवा त्याच्या पूर्वी आहार घेणे सोयीचे ठरते. पश्चिम दिशेला तुमच्या घराची खिडकी येत असेल तर सूर्यास्ताच्या वेळी मंद संगीत आणि चहाचा आस्वाद घेऊ शकता, फक्त पदार्थाचे सेवन टाळा. सूर्यास्तामुळे आजार पसरवणाऱ्या कीटकांचे प्राबल्य वाढते. म्हणून पूर्वी ७ च्या आत रात्रीचे जेवण उरकले जात असे. 

>>झोपेच्या वेळी सूर्य अनुपस्थित असतो, परंतु सकाळ सूर्याच्या किरणांनी होणार असल्यामुळे बेडरूमची दिशा पश्चिमेला असेल तर सूर्यकिरणे थेट बेडरूममध्ये शिरकाव करतील आणि आपली मॉर्निंग आपोआप गुड होईल. 

>>घरातील मौल्यवान वस्तू, पैसे ठेवण्याची जागा अर्थात तिजोरी गुप्त राहावी या हेतूने कपाटाची दिशा उत्तरेला ठेवा. 

वास्तूमध्ये केलेले हे किरकोळ बदल तुम्हाला नवीन ऊर्जा देतील हे नक्की!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र