शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार उंटाची जोडी घरात ठेवल्यामुळे होतात 'हे' फायदे, घराची भरभराट नक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 11:28 IST

उंटाची जोडी घरात ठेवल्यामुळे प्रगती होते आणि कामात यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. उंट हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रम करणारा प्राणी मानला (Camel Vastu Tips) जातो.

अनेकांच्या घरात उंटांचा पुतळा आपण पाहिला असेल. राजस्थान व्यतिरिक्त देशातील इतर अनेक राज्यांमध्ये उंटाच्या मूर्ती घरात ठेवण्याची प्रथा आहे. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार उंटाची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जातं. उंटाची जोडी घरात ठेवल्यामुळे प्रगती होते आणि कामात यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. उंट हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रम करणारा प्राणी मानला (Camel Vastu Tips) जातो.

वास्तुशास्त्रात उंटाचे वर्णन कठोर परिश्रमाचे प्रतीक म्हणून केले आहे. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला करिअरमध्ये वारंवार अपयश येत असेल किंवा पैशाशी संबंधित समस्या सतत येत असतील, तर आपण घरात उंटाची मूर्ती ठेवू शकता.

उंटाची जोडी ठेवण्यासाठी योग्य दिशा -घरामध्ये उंटाची मूर्ती जोडीने ठेवल्याने अनेक फायदे होतात. परंतु, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, मूर्ती घराच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा दिवाणखान्यात वायव्य दिशेला ठेवावी.

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी -जर एखाद्या व्यक्तीच्या करिअरमध्ये सतत अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात अशी उंटाची मूर्ती ठेवावी.

फेंग शुईनुसार -चिनी वास्तुशास्त्र ज्याला आपण फेंगशुई म्हणूनही ओळखतो, जोडीमध्ये असलेली उंटाची मूर्ती नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी खूप मदत करते.

पैसा येण्याचा मार्ग मोकळा -उंटाची मूर्ती घरात ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सामान्य राहते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. तसेच पैशांसंबंधीच्या अडचणी येत नाहीत. तसेच, जर उंटाची मूर्ती जोड्यांमध्ये ठेवली तर ती संपत्तीच्या आगमनासाठी नवीन मार्ग उघडते.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र