शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: तिजोरीची दिशा योग्य असेल तर कधीही भेडसावणार नाही आर्थिक समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 10:52 IST

Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार घरात पैसे योग्य दिशेला ठेवले असता आर्थिक चणचण भासत नाही, उलट धन संपत्तीत वाढ होते!

कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल, की माझ्या हातात पैसा टिकत नाही. यासाठी ते आर्थिक जबाबदारी घेणेसुद्धा टाळतात. कदाचित तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही, परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात. अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातली छोटी मोठी खरेदी, कोणाची जुनी देणी वगैरे काहीही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो. एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनःस्ताप होणे स्वाभाविकच आहे. यावर वास्तू शास्त्राने सांगितलेला तोडगा आजमावून बघा. 

आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. 

पैसा एकाजागी ठेवू नका :

हा तोडगा वाचताक्षणी तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत. कधी तांदुळाच्या डब्यात, तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माळ्यावर. याचे कारण हेच, की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँकादेखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तजवीज करतात. वास्तूशास्त्र देखील हेच सांगते. 

घरात सुरक्षितता पैसा कुठे ठेवायचा? 

वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवतांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते.

घरातला या दिशेला पैसे साठवू नका! 

वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये. कारण यामुळे धनाची हानी तर होतेच शिवाय संपत्तीची वाढही थांबते. बराचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा आणि हा बिनखर्चिक पर्याय वापरून पैशांची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र