शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Vastu tips: चोरून आणलेली मनी प्लांटची वेल पैशांचा पाऊस पाडते? वास्तुशास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 07:00 IST

Vastu Shastra : फेंगशुईनुसार मनी प्लांट हे वैभव देणारे रोप, पण काही जण तिची वेल चोरून आपल्याकडे लावतात. वास्तुशास्त्राने त्याला दुजोरा दिला आहे की नाही ते जाणून घेऊ!

मनी प्लांट प्लांट त्याच्या नावाप्रमाणे काम करते. वास्तूशास्त्रात मनी प्लांटला खूप महत्त्व आहे. घराच्या आत किंवा अंगणात मनी प्लांट लावले असता आणि त्याची यथायोग्य वाढ झाली असता सम्बधित व्यक्ती रोडपतीपासून करोडपती व्हायला वेळ लागत नाही असे म्हणतात. पण ते लावताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर उलट परिणाम समोर येतात.

वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात, खिडकीत विविध प्रकारची रोपे लावली, तर ती पाहून मन प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत, दिवाण खान्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपे लावण्यास सांगितले जाते. तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. याच पार्श्वभूमीवर फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट भारतीय अंगणात रुजू लागले. नावाप्रमाणे ते पैशाचे झाड संबोधल्यामुळे आपसूक लोकांची अपेक्षा वाढली.

अनेकांना चांगले अनुभव आले, तर अनेकांना काहीच फरक पडला नाही. काही ठिकाणी तर मनी प्लांटची वाढदेखील झाली नाही. याला वास्तुशास्त्रात काही कारणे दिली आहेत. ती कोणती, ते जाणून घेऊ -

>>वास्तुशास्त्रानुसार दक्षिण पूर्व दिशा मनी प्लांटसाठी सर्वात योग्य दिशा आहे. कारण गणपती बाप्पा या दिशेचा स्वामी आहे. या दिशेने मनी प्लांट लावले असता घरात सुख समृद्धी येते. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि पैशांचा तुटवडा कधीच जाणवत नाही.

>>उत्तर पूर्व आणि पूर्व पश्चिम दिशेला मनी प्लांट अजिबात लावू नये. त्यामुळे संपत्तीचा क्षय होतो. घरात आजारपण येते. नकारात्मक ऊर्जा खेचली जाते आणि वरचेवर कर्जबाजारी होण्याचे प्रसंग ओढवतात.

>>मनी प्लांट घराबाहेर न ठेवता घरात ठेवावे. जिथे सूर्यप्रकाश मिळाला नाही, तरी किमान उजेड मिळू शकेल. मात्र मनी प्लांटची जागा अशी निवडावी, जिथे लोकांचे सहज लक्ष जाणार नाही. त्यामुळे मनी प्लांटचा उचित फायदा मिळेल आणि त्याची योग्य वाढ देखील होईल.

>>मनी प्लांटची वाढ छान होत असेल, तर त्याची वेल घराच्या भिंतीवर नैसर्गिकरित्या पसरू द्यावी. त्यामुळे घरात संपत्तीची वाढ होते.

प्रश्न राहिला मनी प्लांट चोरून लावण्याचा तर... : 

अनेक जण सांगतात, की दुसऱ्याच्या घरून चोरून आणलेली मनी प्लांटची वेल आपल्या घराच्या रोपट्यात रुजवली तर त्यातून भरपूर धनलाभ होतो. मात्र अशा कोणत्याही गोष्टीला वास्तू तज्ञांनी याला दुजोरा दिलेला नाही. उलट कोणतीही अनैतिक गोष्ट वास्तूला त्रासदायक ठरू शकते. म्हणून चोरी न करता विकत आणलेले किंवा निसर्गात मिळालेली वेल आपल्या अंगणात रुजवणे कधीही इष्ट! 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र