शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: सूर्यास्तानंतर घरात 'या' गोष्टी करणे टाळा; होऊ शकते मोठे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 14:13 IST

Vastu Tips: तिन्ही सांजेला दिवा पाहुन लक्ष्मी येते अशी आपली श्रद्धा आहे, त्यामुहूर्तावर कोणती कामे टाळावी, ते जाणून घ्या. 

वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास आयुष्य कमी कष्टदायी होते. वास्तु टिप्समध्ये सांगितल्याप्रमाणे काही कामे सूर्यास्तानंतर करू नयेत. त्यामागे असलेली कारणे जाणून घेतली तर आपणही त्या नियमांचे पालन अवश्य कराल. मात्र जाणून बुजून केलेल्या कामांचा विपरीत परिणाम तुमच्यासह कुटुंबालाही भोगावा लागतो असे वास्तू शास्त्रात म्हटले आहे. 

सनातन धर्मात रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्थात दोन पळी पाणी सूर्याच्या दिशेने सोडून त्याला नमस्कार करून, कृतज्ञता व्यक्त करावी. हे शास्त्र जसे सकाळी पाळायचे, तसे काही नियम सूर्यास्ताच्या वेळीही पाळायचे असे वास्तू शास्त्र सांगते. 

या गोष्ट करू नका

>>असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ ठिकाणीच वास करते. त्यामुळे घराच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घर झाडू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात मुक्काम करत नाही. परिणामी आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच घरात नकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे संध्याकाळी केर काढू नये. 

>>तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. या रोपाला रोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. मात्र सायंकाळी तुळशीची पाने तोडू नये. तसेच सूर्यास्तानंतर कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नये.

>>याशिवाय सायंकाळी घराच्या प्रवेश द्वारावर, ओट्यावर बसू नये. अर्थात लक्ष्मीचा मार्ग अडवू नये. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच रात्री केस कापू नये, नखं देखील संध्याकाळी कापू नये.या नकारात्मक गोष्टी तसेच स्वच्छतेशी निगडित गोष्टी दिवसा कराव्यात असे शास्त्र सांगते. अन्यथा या गोष्टी नकारात्मक रित्या आपल्यावर उलटू शकतात. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र