शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: स्वयंपाकघरातील 'या' तीन गोष्टी कधीही संपू देऊ नका, अन्यथा वास्तूवर होईल दुष्परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:11 IST

Vastu Shastra: 'घर भरलेले असावे' असा आशीर्वाद थोरा मोठ्यांकडून दिला जातो, घरात सुबत्ता नांदावी म्हणून या वास्तू टिप्स देखील फॉलो करा!

घरात काय आहे, काय नाही याकडे गृहिणींचे बारीक लक्ष असते. मात्र नोकरी-व्यवसायाच्या गडबडीत किंवा इतर काही कामांच्या नादात स्वयंपाक घराकडे दुर्लक्ष होऊ शकते. परंतु वास्तू शास्त्रानुसार काही गोष्टींनी तळ गाठणे हे वास्तूच्या दृष्टीने हितावह ठरत नाही. त्यामुळे घराची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. कारण या वस्तू केवळ अन्न धान्य नाही तर सुबत्तेचेही लक्षण मानले जाते. 

गृहिणींचा सगळ्यात जास्त वावर असतो तो स्वयंपाकघरात. त्यामुळे वास्तुशास्त्र सांगते, की स्वयंपाक घरातील वस्तूंची नियमावली यथायोग्यपणे सांभाळली असेल तर वास्तू दोष निर्माण होत नाहीत. याउलट स्वयंपाकघरातील गोष्टींमुळे वास्तू दोष निर्माण झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. म्हणून अत्यंत सावधतेने घराचा डोलारा सांभाळावा लागतो. यात कोणत्या चुका करायच्या नाहीत ते जाणून घेऊया. 

तांदूळ : 

तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे मुख्यतः भारतीय घरांमध्ये तांदूळ असतोच. तांदळाला धार्मिक आणि वास्तू शास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्व आहे. लग्नात अक्षता म्हणून, नववधूला माप ओलांडताना तसेच आशीर्वादाच्या अक्षता म्हणूनही तांदुळच दिला जातो.  वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र ग्रहाशी अर्थात सुबत्तेशी संबंधित असतो. अशा स्थितीत जर तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ संपला तर त्यामुळे शुक्रदोष होतो ज्यामुळे तुमच्या भौतिक सुख आणि ऐश्वर्यामध्ये घट होते.

हळद : 

हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य मसाला आहे. आयुर्वेद, धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र अशा अनेक दृष्टीने हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तूनुसार, जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपुष्टात आली असेल, तर तुमच्या गुरु दोष निर्माण होऊन वास्तू दोष निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डब्यातली हळद पूर्णपणे संपण्याआधी ती नव्याने भरून ठेवा. तसेच हळद कधीही शेजाऱ्यांकडे मागू नका किंवा कोणाला देऊ पण नका. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. 

मीठ :

वास्तुशास्त्रात मिठाला फार महत्त्व आहे. मीठ हे समुद्रातून निघालेले असल्यामुळे लक्ष्मीचा भाऊ म्हणूनही ते संबोधले जाते. म्हणून आपण मीठ सांडू देत नाही. तसेच मिठाशिवाय स्वयंपाक अळणी होतो आणि जास्त पडले तर खारट होतो. त्यामुळे मीठ प्रमाणात असलेच पाहिजे. लादी पुसण्याचा पानात मीठ टाकले असता समृद्धी येते असे वास्तू शास्त्र सांगते. म्हणूनच की काय, लक्ष्मी पूजेत केरसुणी बरोबर मिठाचीही पूजा केली जाते. म्हणून घरात मीठ संपू देऊ नका, त्याआधीच नवी पुडी विकत आणा आणि सायंकाळी कधीही मिठाची देवाण घेवाण करू नका, अन्यथा आर्थिक स्थिती खालावते, असे वास्तू शास्त्र सांगते. 

 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र