शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Vastu Shastra: वास्तूमध्ये 'हे' किरकोळ बदल करा आणि घराचे कुरुक्षेत्र होण्यापासून वाचवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 12:01 IST

Vastu Tips: घरात किरकोळ वाद झाले तर हरकत नाही, पण रोजचेच वाद होऊ लागले की वास्तुदोष निर्माण होतो, तो टाळण्यासाठी या टिप्स!

घर म्हटले की भांड्याला भांडे आपटणारच! त्यातही सासू सुनांचे वाद म्हणजे दोन पिढ्यांच्या परस्पर विरुद्ध विचारधारा, त्या एकत्र येणे कठीण! परंतु दोघींनी वेळोवेळी माघार घेऊन विषयाचा मध्य गाठायला हवा, अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा धुमसणाऱ्या घरात कोणाचेच मन शांत राहणार नाही. म्हणून सासू सुनेने सामंजस्य दाखवण्या बरोबर पुढील वास्तू टिप्सचा अवलंब करून पहावा. त्याचा नक्कीच उपयोग होईल. 

>> घरात चंदनाची कोणतीही मूर्ती ठेवा. मात्र ती अशा दर्शनीय ठिकाणी ठेवा, जिथे सासू सूनेचेच नाही, तर घरातल्या प्रत्येक सदस्याची नजर जाईल. चंदनाच्या मूर्तीच्या दर्शनामुळे त्या मूर्तीची शीतलता बघणाऱ्याच्या नजरेत उतरते आणि मन शांत होऊन मनातील अढी दूर होते. 

>>  स्वयंपाक घराचा रंग उग्र नसावा. सासू सुनेचा अधिकतर वेळ स्वयंपाक घरात जातो. आधीच उद्विग्न झालेल्या मनावर घरातील गडद रंगसंगतीचा विपरीत परिणाम होतो. त्यात स्वयंपाक घरात सतत पसारा, चूल आणि मूल यांचा सतत वावर यामुळे ती जागा सतत वापरात असते. तो परिसर सौम्य आणि प्रसन्न रंगाचा असेल तर घरातील महिला वर्गाची मनःस्थिती उत्तम राहते. 

>>  घरात नवरा बायकोचे, कुटुंबाचे, मुलांचे छायाचित्र लावतो. ते केवळ शोभा वाढवण्यासाठी नाही, तर ते छायाचित्र आपल्याला सतत आपल्यातील ऋणानुबंधांची आठवण करून देत असते. त्याचप्रमाणे सासू आणि सुनेचे छायाचित्र छान फ्रेम करून एखाद्या भिंतीवर लावा. त्याचाही त्या दोघींच्या नात्यावर सकारात्मक परिणाम नक्कीच पडेल. 

>>  सासू सुनेच्या खोलीत नदीचे तसेच वाहत्या झऱ्याचे चित्र लावावे. त्यामुळे वाहत्या पाण्याप्रमाणे मनातील दूषित विचार वाहून जातील आणि नात्यात पारदर्शकता येण्यास मदत होईल. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र