वरुथिनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या सर्वाधिक फलदायी एकादशींपैकी एक मानली जाते. पुराणांनुसार, या दिवशी विष्णू नामाचा जप केल्याने केवळ या जन्मातीलच नव्हे, तर अनेक जन्मांची पापे भस्म होतात. आज या एकादशी निमित्त मोक्षदायी विष्णू मंत्र जाणून घेऊ आणि त्याचे चिंतन करू.
हे ही वाचा : Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
वरुथिनी एकादशीला 'संरक्षण देणारी एकादशी' म्हटले जाते. या दिवशी शुद्ध अंतःकरणाने मंत्रजप केल्यास व्यक्तीला १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. पुढे दिलेल्या मंत्रांचे पठण करा.
१. द्वादशाक्षर महामंत्र (सर्वात प्रभावी)
"ॐ नमो भगवते वासुदेवाय"
अर्थ: मी भगवान वासुदेवाला (विष्णूंना) नमन करतो.
महत्त्व: हा विष्णू भक्तीचा सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि घरात सुख-शांती नांदते.
२. पापमुक्ती आणि मोक्ष मंत्र
"ॐ नमो नारायणाय"
महत्त्व: हा अष्टाक्षर मंत्र साक्षात वैकुंठाची दारे उघडणारा मानला जातो. वरुथिनी एकादशीला या मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने अजाणतेपणी घडलेल्या पापांचे क्षालन होते.
हे ही वाचा : वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
३. संकट निवारक विष्णू मंत्र
"शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं,विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम्।"
महत्त्व: विष्णू स्तुतीचा हा श्लोक जीवनातील भीती आणि चिंता दूर करतो. संकटाच्या काळात या मंत्राचे पठण केल्याने भगवान विष्णू भक्ताचे ढाल बनून रक्षण करतात.
४. श्री विष्णू गायत्री मंत्र (बुद्धी आणि प्रकाशासाठी)
"ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु: प्रचोदयात्॥"
महत्त्व: हा मंत्र मनाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
हे ही वाचा : Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
५. क्षमा प्रार्थना मंत्र
"कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्।करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि॥"
महत्त्व: दिवसाच्या शेवटी किंवा पूजेनंतर हा मंत्र म्हटल्याने, आपल्याकडून दिवसभरात झालेल्या चुकांची देव क्षमा करतो आणि आपले कर्म शुद्ध होते.
मंत्र जपाचे काही नियम:
वेळ: ब्राह्म मुहूर्तावर (सकाळी ४ ते ६) जप करणे सर्वोत्तम मानले जाते.
माळ: शक्य असल्यास तुळशीच्या माळेने जप करावा.
एकाग्रता: मंत्र जपताना भगवान विष्णूंच्या शांत स्वरूपाचे किंवा वराह अवताराचे ध्यान करावे.
Web Summary : Varuthini Ekadashi is auspicious for Vishnu devotees. Chanting Vishnu mantras on this day destroys sins and leads to salvation. Key mantras include the Dwadashakshar Mahamantra and the Narayana mantra, promoting peace, removing negativity, and seeking forgiveness. Reciting with focus yields immense benefits.
Web Summary : वरुथिनी एकादशी विष्णु भक्तों के लिए शुभ है। इस दिन विष्णु मंत्रों का जाप करने से पापों का नाश होता है और मोक्ष की प्राप्ति होती है। द्वादशाक्षर महामंत्र और नारायण मंत्र जैसे प्रमुख मंत्र शांति को बढ़ावा देते हैं, नकारात्मकता को दूर करते हैं और क्षमा मांगते हैं। एकाग्रता से पाठ करने से अपार लाभ मिलता है।