शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Varuthini Ekadashi 2025: काय आहेत वरुथिनी एकादशी व्रताचे लाभ? जाणून घ्या व्रताचरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:20 IST

Varuthini Ekadashi 2025: २४ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी आहे, 'हे व्रत कर', असा सल्ला कृष्णाने धर्मराजालाही दिला होता; सविस्तर माहिती वाचा.

यंदा २४ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी(Varuthini Ekadashi 2025) आहे. चैत्र कृष्ण एकादशीला 'वरुथिनी एकादशी' असे नाव आहे. आपल्याकडे प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे. धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला 'एखादे प्रभावी व्रत सांगा' अशी विनंती केली आणि विनंतीनुसार श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले, अशी कथा आहे. हे व्रत पापनाशक आणि इहपरलोकी सुख समाधान देणारे आहे. या व्रताच्या प्रभावाबद्दल आणखीही अनेक कथा ग्रंथांतरी नमूद आहेत. त्यापैकी एक कथा अशी- 

काशीमध्ये राहणाऱ्या एका ब्राह्मणाला तीन मुलगे होते. त्यांच्यातील सर्वात मोठा मुलगा दुर्गुणी, दुराचारी होता. ब्राह्मण रोज भिक्षा मागून कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. कालांतराने तो आजारी पडला. तेव्हा त्याने या तिन्ही मुलांना भिक्षेसाठी जाण्याचा परिपाठ दिला. त्याच वेळी त्यांना वेदाध्ययन करण्याचा सल्लाही दिला. त्याच्या सांगण्यावरून दोन मुलांनी वेदाध्ययन केले. नंतर ते दोघे आपला उदरनिर्वाह अतिशय मानाने करू लागले. मोठा मात्र काही न करता तसाच राहिला. इतकेच नव्हे, तर एका मुलीला फसवून घरी घेऊन आला. त्यावेळी ब्राह्मणाने त्याला घराबाहेर काढले. तो मुलगा दुसऱ्या गावी दारिद्रयात राहू लागला. एक दिवशी त्याच्या लहान भावाने त्याला `वरुथिनी एकादशी'चे व्रत करण्यास उद्युक्त केले. यथाकाल वडिलांनी त्याला पुन्हा घरात घेतले.

दुसऱ्या कथेनुसार कुशवती नगरीमध्ये महोदय नामक एक श्रीमान वाणी राहत होता. त्याने हे वरुथिनी एकादशीचे व्रत मोठ्या श्रद्धेने केले. त्याचे फळ त्याला मिळाले. तो त्या नगरीचा राजा झाला. त्याने आपल्या प्रजेला या व्रताचे महात्म्य सांगून सर्वांनाच हे व्रत करण्याचे आवाहन केले. त्याच्या शब्दाला मान देऊन त्याप्रमाणे हे व्रत केले. त्यामुळे त्याच्या राज्यात दु:खी, गरीब असे कोणीच राहिले नाही. सारेच सुखी व समाधानी जीवन व्यतीत करू लागले.

वरील दोन्ही कथांवरून लक्षात येते, की वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे ग्रहदशा पालटण्यास मदत होते. परंतु, केवळ हे कारण पुरेसे नाही, तर ही प्रयत्नांना उपासनेची जोड आहे. केवळ व्रत करून यशस्वी होता आले असते, तर कोणी प्रयत्न केलेच नसते. परंतु, अशा प्रकारची उपासना आपले मन एकाग्र करण्यास मदत करते. प्रापंचिक विषयातून मन दूर करून आपल्या ध्येयावर केंद्रित करण्यास मदत करते. एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळचा उपास हा वासनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुचवलेला उपाय आहे. तोंडावर ताबा ठेवला की आपोआप मनावर ताबा येतो. मन शांत असले की ध्येयाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो.  ही महती आहे एकादशीची! महिन्यातून दोनदा हे व्रत येते. ते भक्तिभावाने केले असता, त्याचे अनेक लाभ होतात.

व्रताचरण : एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. पिवळी फुले वाहावीत. चंदन लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. त्यानंतर विष्णु सहस्रनामाच्या पठणासह एकादशी व्रताची कथा वाचावी. शेवटी आरती करावी. दिवसभर ईश्वराचे स्मरण ठेवून आपले दैनंदिन कार्य करावे. आणि एकादशीच्या दिवशी फळ खाऊन द्वादशीला पुनश्च विष्णू पूजा करून उपास सोडावा. उपास आणि साग्रसंगीत पूजा शक्य नसेल तर किमान १०८ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करावा.

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी