शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
2
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा
3
"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
4
ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा
5
"एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर...", श्रीकांत शिंदे आरक्षणाच्या निर्णयावर काय बोलले?
6
६० कोटी घोटाळ्याचा आरोप, शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय! मुंबईतील 'बॅस्टियन' रेस्टॉरंटला लागणार कुलूप
7
Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार
8
Virat Kohli Fitness Test : कोहलीसाठी कायपण! BCCI नं परदेशातच घेतली फिटनेस टेस्ट?
9
बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...
10
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
11
मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचे स्मरण करता की नाही? ‘असा’ आहे कालातीत ऋणानुबंध
12
Mark Mobius Prediction: चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
13
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
14
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
15
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
16
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
17
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
18
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
19
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
20
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत

वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:37 IST

Waman Jayanti 2025: श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत. कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे!

Waman Jayanti 2025: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गणेशोत्सव कालावधीत काही महत्त्वाची व्रते येतात. संपूर्ण मराठी वर्षात काही तिथी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत येणाऱ्या या दिवसांत अनेक व्रते आचरली जातात. मात्र, त्यातील काही तिथींना ऐतिहासिक, पौराणिक घटना वा प्रसंगांमुळे वेगळे महत्त्व प्राप्त होते. वर्षभरातील या तिथींपैकी विशेष महत्त्व प्राप्त झालेली तिथी म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी. महाविष्णूंच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार असलेल्या वामनाचा जन्म भाद्रपद द्वादशीला झाल्याचे मानले जाते. म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून साजरी केली जाते.

यंदा, गुरुवार, ०४ सप्टेंबर २०२५ रोजी वामन जयंती आहे. वामन जयंती देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. विष्णूंच्या या वामन अवताराची एक पौराणिक कथा सांगितली जाते. श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत, त्यांचे आपल्या भक्तांवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असते आणि विविध प्रसंगांनी आपले ते निखळ प्रेम श्रीभगवंत व्यक्त करतातच. अशीच एक निरतिशय प्रेमाची सुखद लीला म्हणजेच श्रीभगवंतांचा श्रीवामन अवतार होय!

बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार

प्रात:स्मरणीय भक्तराज श्री बलिराजा यांच्या उद्धारासाठी आणि देवतांचे राज्य त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी हा अवतार झाला. पण भक्तिशास्त्रात सांगितलेले भक्तांचे माहात्म्यच खरेतर या लीलेतून अधिक उजळून निघताना दिसते. भक्त कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाऊनही आपल्या लाडक्या श्रीभगवंतांना धरूनच ठेवतात, त्यांची प्राप्ती करूनच घेतात, हेच या सुमधुर लीलेतून दृग्गोचर होते.

आपल्या शेतकऱ्यांचा हा बळी राजा नाही!

आपल्याकडे शेतकऱ्याला 'बळीराजा' म्हणतात, त्यात या दैत्यराज बळीचा काहीही संबंध नाही. शेतकऱ्यांचा राजा बळी म्हणजे हा दैत्यराज बळी नव्हे. भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलिभद्र, श्रीबलराम हे शेतकऱ्यांचे राजे मानले जातात. म्हणूनच तर त्यांचे आयुध हल किंवा नांगर आहे, जे सर्व शेतकऱ्यांचे अत्यंत आवश्यक असे हत्यार आहे. 'हलधर' हे त्यामुळेच श्रीबलरामांचे एक नाव आहे. भगवान श्रीवामन हे प्रत्यक्ष भगवान श्रीमहाविष्णू आहेत. श्रीभगवंत कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे!

वामन जयंतीची पौराणिक कथा

भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरु शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात. शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्रावर हल्ला करण्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.

महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे वामन असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरु देवांनी कमंडळु, माता अदितीने कॉपीने, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.

वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञा स्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रुपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. 

शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि द्वारपालपद स्वीकारतात.

॥ ॐ ॐ तपरूपाय विद्महे, सृष्टिकर्ताय धीमहि, तन्नो वामनः प्रचोदयात् ॐ ॥

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :chaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक